अधिवेशनात scst ,vjnt, sbc, obc चे पदोनत्ती मध्ये आरक्षणाचा मुद्धा उपस्थित करा: – इ झेड खोब्रागडे.
मराठा आरक्षणाचा विषय विरोधी पक्ष नेते आक्रमक पणे विधिमंडळात सभागृहात मांडताना पाहिले. . मात्र, Scst SBC, VJNT, OBC च्या आरक्षणाचा प्रश्न , सरळ भर्ती आणि पदोनत्ती मध्ये आरक्षण देण्याचा विषयावर सभागृहात चर्चा का होत नाही, हे विरोधी पक्ष नेत्यांनी चर्चा घडवून आणावी, प्रश्न मांडावेत . सत्ता पक्षाच्या आमदारांनी सुद्धा हा विषय घ्यायला पाहिजे.
सरळ भर्ती आणि पदोनत्ती चे मिळून 81000 पदे रिक्त आहेत, GAD कडील 2017-18 च्या RTI माहितीनुसार. पदोनत्ती ची सर्व पदे बिंदू नामावली प्रमाणे भरण्यात यावीत , दि.18 फेब्रुवारी 2021 चा GR दुरुस्त करावा अशी मागणी विविध संघटनांनी सरकार कडे केली आहे. Scst, obc, sbc, vjnt चे आमदार व मंत्री महोदयांनी आणि संविधानाची शपथ घेतलेल्या सर्वांनी संविधानिक हक्क मिळवून देण्यासाठी आणि हक्काचे संरक्षण करण्यासाठी आपले दायित्व पार पाडावे असे मत इ. झेड खोब्रागडे यांनी व्यक्त केले आहे.. जनतेच्या हितासाठी कोणकोणते विषय महत्त्वाचे आहेत, हे लोकप्रतिनिधींना माहीत आहे. मात्र हे प्रश्न ,राजकीय इच्छा शक्तीचा आहे. सामाजिक प्रतिनिधित्वाचा, समता व न्यायाचा हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी मंत्रीगटाने पुढाकार घ्यावा. आरक्षणाची सरळ भर्ती आणि पदोनत्ती चे सर्व रिक्त पदे बिंदू नामावलीप्रमाणे आरक्षित वर्गातून भरण्याची प्रकिया कालमर्यादा ठरवून 100% भरावीत. अशी मागणी ही इ झेड खोब्रागडे,(भाप्रसे से. नि.) यांनी केली आहे.