दिघंची वार्ताहर/ पोपट वाघमारे -चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे.गावात शांतता ठेवणे व सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देणे हे आपले काम आहे केलेल्या कामाची प्रसिध्दी आमच्या कार्यकर्त्यांनी कधी मिळवली नाही .कारण आपलं कामच दाखवून देत असते असे उदगार माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी प्रणव गुरव यांच्या भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी निवडीवेळी सत्कार प्रसंगी काढले.
निवडीचा कार्यक्रम गणेश मंगल कार्यालय दिघंची येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य मोहन रणदिवे,अरूण बालटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती बळीराम मोरे, जेष्ठ नेते बंडूपंत देशमुख, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पुसावळे, केशव मिसाळ, अजित मोरे,प्रकाश शिंदे, सोपान काळे, सावंता पुसावळे, उपस्थित होते.
पुढे देशमुख म्हणाले आटपाडी मार्केट कमिटी जिल्ह्यात दोन नंबरला आहे.याचे मार्केट कधी केले नाही.कारण काम महत्त्वाचे आहे .
यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंच उपसरपंच यांचा व आॅलम्पिक विर खाशाबा जाधव पुरस्कार प्राप्त गव्यरत्न विवेकानंद जितकर यांचा माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी नानासाहेब मेनकुदळे,माजी उपसभापती जयवंतराव सरगर,माजी उपसभापती आण्णासाहेब रणदिवे ,माजी सरपंच हरिदास पवार,सयाजी मोरे,कुष्णदेव मोरे,दशरत मोरे, बंडू मोरे, सुर्यकांत गुरव, गणेश माने, केवल कवडे, वैभव सस्ते, संकेत गोंजारी, गौरव घोंगडे, अमरीश ऐवळे उपस्थित होते.