महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र असं का म्हणलं जातं याचं हे एक ठळक उदाहरण म्हणजे बौद्ध व मराठा समाजातील आंतरजातीय विवाह होय.
ही गोष्ट आहे पेण जिल्हा रायगड येथील हर्षाली आणि जितेश ची.दोघेही सुशिक्षित उच्चशिक्षित, हर्षली नोकरी करते तर जितेश व्यावसायिक आहे. दोघांचे एकमेकांवर प्रेम,त्यांनी ते घरी कुटुंबीयांना कळवलं.घरून विरोध होईल असं वाटलं परंतु दोन्ही घरातून मुलांच्या पसंतीला संमती मिळाली.आणि दोघांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
लग्नाच्या बोलणीसाठी दोन्ही कुटुंब एकत्र आली आणि लग्नाचा ठराव यशस्वी झाला,दोन्हीकडच्या पाच पाच व्यक्तीनी यात सहभाग घेतला.तुमची पद्धत आमची पद्धत आणि त्यातून काढलेला मध्यममार्ग यामुळे ही दोन्ही कुटुंबे एका आदर्श विचारांनी आणि मनांनी एकत्र आली.
दोन्ही कुटुंबियांच्या नातेवाईक आप्तेष्ठ मित्र मंडळी गावकऱ्यांच्या उपस्थितीत हा आनंददायी सोहळा पार पाडला. हा सोहळा उर्वरित समाजासाठी एक चांगला आदर्श असून यामुळे अशा विवाहास समाजात असणाऱ्या जातीयभेदास समूळ नष्ट करण्याचे एक साधन म्हणून पाहता येवू शकते.
उच्च शिक्षित तरुणांनी यासाठी असा पुढाकार घेणे गरजेचे आहे,आपले शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायावर उभे राहून तरुणांनी असे आदर्श उदाहरण दाखवून समाजाला योग्य वाटेवर आणणे ही जबाबदारी तरुणांची आहेच तसेच दोन्ही कुटुंब आणि उर्वरित समाजाची सुद्धा आहे.एक पाऊल समतेच्या दिशेने टाकणे जबाबदारी सर्वांची आहे.
अशा बातम्याना खरेतर मेनस्ट्रिम माध्यमात प्रसिद्धी मिळणे गरजेचे असते. निकोप आदर्श समाज घडविण्यासाठी अशा घटना एक आदर्श म्हणून समोर असतात,मात्र प्रस्थापित माध्यमे अशा गोष्टींकडे कायम कानाडोळा करताना दिसतात.आणि म्हणून जागल्या भारतची निर्मिती आणि आवश्यकता इथे नितांत भासते.प्रस्थापित माध्यमांना असा पर्याय उपलब्ध असणे समाजासाठी गरजेचे आहे.या आदर्श विवाहास जनविद्रोही न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा
जय भीम जय शिवराय!