याबाबत सविस्तर वृत्त असे की ………….जातीयवाद्यांनी बौद्ध तरुणाच्या डोक्यात कुराडीने केला हल्ला! अतिशय गंभीर नांदेड हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज… शिवनी जामगा, ता. लोहा, जिल्हा नांदेड येतील संदीप दुधमल शेतावरुन साइकल वर घरी येताना वाटेमधे जातीयवादी दोघे मोटारसायकल वरून घरी येताना संदीप दुधमालच्या सायकलला धडक मारली. त्यानंतर संदीपने जाब विचारला की, तुम्ही मला का धडक मारली. तेंव्हा जातीयवाद्यानी खाली उतरून ये धेडग्या ये महार्ग्या अशी जातीय शिवीगाळ करून संदीपला मारहाण करण्यात आली. एवढ्या वर न थांबता जातीयवाद्यांनी घरी जाऊन 8 ते 10 जणांना कुराडी काठ्या घेऊन संदीप दुधमलच्या घरावर हल्ला केला. संदीपची आई, भाऊ, वडील, चुलता, चुलती बहीण याना घरात घुसून धेडग्यानो लय माजल्या काय? असे म्हणत मारहाण करण्यात आली.
ही मारहाण सुरू असताना हे भांडण सोडवायला गेलेल्या गणेश एडके या बौद्ध तरुणांच्या डोक्यामध्ये यातील एकाने कुऱ्हाडीचा घाव घातला, यात तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. घाव अतिशय खोल असून अतिशय गंभीर जखमी आहे. मृत्यूशी तो झुंज देत आहे. नांदेड शहरात तो ऍडमिट आहे. गावात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
ऑल इंडिया पँथर सेना या घटनेचा जाहीर निषेध करत आहे. आमचा बौद्ध बांधव या राज्यात सुरक्षित नाही. तात्काळ सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे, जखमी पीडित गणेश एडके या बौद्ध तरुणाला चांगल्या दवाखान्यात चांगला इलाज केला पाहिजे. लोहा हे जातीय अत्याचाराचे केंद्र होत चालले आहे. नांदेड मधील कार्यकर्त्यांनी तात्काळ पीडिताला वाचवण्यासाठी व आरोपीना अटक करण्यासाठी धाव घ्यावी!
(पीडित : 9545113458)
वंचित आघाडीचे अमित भाई भुईगळ यांनी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन या प्रकरणी आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे अशी मागणी केली आहे.. ऑल इंडिया पँथर सेनेचे दीपक भाई केदार यांनी या प्रकरणात विशेष लक्ष दिले आहे.
दलित व बौद्ध अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत भाजप सरकार होते आणि आता आघाडी सरकार तरी ही अन्याय राजरोसपणे केले जात आहेत त्यामुळे बौद्ध युवक आक्रमकपणे म्हणत आहेत मेंदूने पांगळ सरकार न्याय देईल का? सरकारने कठोर कारवाई करून आपण विकलांग नाही हे सिद्ध करावे.