माळशिरस तालुका प्रतिनिधी: युवराज नरुटे (9011394020)
बचेरी ग्रामपंचायत मध्ये शेतकरी विकास पॅनेल व परशुराम आघाडीची महायुती करुन सरपंच, उपसरपंच निवड शांततेत पार पडली असुन निकाल धक्कादायक पाहावयास मिळाला. परशुराम आघाडीने 8-3 असा विजश्री खेचुन आणला होता परंतु आतंर्गत कुरघोडीला कंटाळून मंगेश पाटील, मोहन शिकारे ,महादेव बरकडे हे तीन सदस्य बाजुला झाले व त्यांनी शेतकरी विकास आघाडीशी युती करून सत्तेचा सारीपाट रचला.
यावेळी शेतकरी विकास आघाडीच्या सदस्यांनी पदवीधर सदस्य राणीताई विश्वजीत गोरड, जयवंत भिसे, शालन माने, यांनी मंगेश पाटील यांना सरपंच पदी विराजमान केले तर उपसरपंच पदी विकासप्रिय जेष्ठ सदस्य मोहन शिकारे यांची उपसरपंच पदी निवड केली. मराठा समाजाला खुर्ची देवुन धनगर समाजाने मनाचा मोठेपणा दाखवून सर्व धर्मसमभाव जोपासला याचे पिलीव पंचक्रोशीतुन कौतुक होत आहे. सर्व सदस्य सुशिक्षित असल्यामुळे रखडलेल्या कामाला गती मिळेल यात तिळमात्र सुद्धा शंका नाही. हे विकासप्रिय युवक एकत्र आणण्यासाठी प्रा. शंकर शिंदे सर, मा. सरपंच लक्ष्मन तात्या गोरड, मा. सरपंच सोमनाथ गाढवे, बिराभाय शिंदे, दिलीप माने, गणेश काका गोडसे ,आप्पासाहेब बरकडे, गोविंद शिंदे मा. उपसरपंच सुदाम शिंदे, धुळा ठेंगल, संभाजी सर्जेराव शिंदे, ज्ञानेश्वर माने, बाळु शिंदे मुकादम, यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.