लातूर प्रतिनिधी: महाराष्ट्र हादरला ही बातमी धक्कादायक आहे.लातूर शहरातल्या एकाच शाळेत तब्बल 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. 40 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचं समोर आल्याने 320 विद्यार्थी, 10 शिक्षक, 20 कर्मचारी क्वारंटाईन झाले आहेत.
एमआयडीसी भागात असलेल्या पब्लिक शाळेच्या वसतिगृहातील 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे विद्यार्थी शिक्षणासाठी लातूरच्या या शाळेच्या वसतिगृहात रहायला आहेत.
हे स्कूल सीबीएसई आहे .या स्कूलच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीमध्ये कोरोनाची पहिल्यांदा लक्षणे आढळली. त्या नंतर इतर विद्यार्थ्यांची तपासणी केली असता तब्बल 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या विद्यार्थ्यांवर लातूरच्या शासकीय वसतिगृहात असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार सुरु आहे.
लातूर परिस्थिती काय म्हणते कोरोनाची !
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. राज्यांतल्या विविध शहरांत कोरोनाचे अधिकाधिक संख्येने रुग्ण मिळत आहेत. लातूरातही काल (सोमवारी) एकाच दिवशी 35 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर दुर्दैवीरित्या 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.
लातुरात आतापर्यंत 24 हजार 901 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 23 हजार 856 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. तर जवळपास 150 रुग्णांवर शहरातल्या विविध रुग्णांलयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर काही रुग्ण होम क्वारंटाईन आहेत.
नागरिकांनी नियम पाळावेत. शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन नागरिकांनी करुन शासन आणि प्रशासनाला सहकार्य करावं, असं सांगत सध्या तरी लातुरात लॉकडाऊनचं कुठलंही प्रयोजन नाही मात्र नागरिकांनी नियम पाळले नाही तर कठोर पावलं उचलावी लागतील, असा इशारा लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.