गारवाड प्रतिनिधी- तालुक्यातील गारवाड ग्रामपंचायत सरपंचपदी मागासवर्गीय महिला सौ.सारिका सुभाष साठे व उपसरपंचपदी मा .धनाजी मगर यांची निवड एकमताने करण्यात आली.एकूण अकरा ग्रामपंचायत सदस्य असणारी गारवाड मगरवाडी ग्रामपंचायत आहे.
या गावावर विशेष असे प्रेम दिवंगत भीमा तात्या सावंत यांचे होते. मा.अर्जुनसिंह (दादा )मोहिते पाटील , मा.के के (दादा) पाटील यांचं ही व्यक्तिगत लक्ष सदरच्या गावावर असते हे पण महत्वाचे आहे.
या ग्रामपंचायत वेळी दोन्ही भाजपा पुरस्कृत पॅनल समोरासमोर होते एका पॅनल ला अर्जुनसिंह मोहिते पाटील तर दुसऱ्या पॅनल ला विजयसिंह मोहिते पाटील असे नाव देण्यात आले होते.
अभिनंदनीय व विशेष बाब म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने गारवाड या गावातील एकाच घरातील मागासवर्गीय कुटुंबाच्या दोन महिला खुर्चीवर आरूढ झालेत. महिला राज च्या रूपाने एक आहेत सभापती सौ. शोभा सुनील साठे तर दुसऱ्या नवनिर्वाचित सौ.सारिका सुभाष साठे या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.
आजच्या निवडीदरम्यान ग्रामसेवक देशमुख सो,तलाठी ए .व्ही वाळुंजकर यांनी चोख काम पाहिले.सदरच्या निवडीने गावात जल्लोष साजरा करण्यात आला.यावेळी राघू मगर,सुभाष साठे,माणिक मगर पाटील,मोहन करडे,शहाजी मगर,संजय पाटील,सतीश मगर इ सह सत्ताधारी सदस्य व विरोधी सदस्य ,ग्रामस्थ मोठ्या संख्याने उपस्थित होते.
Copyright©2021| जनविद्रोही
संपादक डॉ.कुमार लोंढे. Mo.9881643650