धक्कादायक प्रकार डॉक्टरची पत्नी व दोन मुलांसह आत्महत्या ! दरवाजाला चिट्ठी चिटकवून आत्महत्या….
कर्जत प्रतिनिधी – अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात धक्कादायक प्रकार घडला आहे.एक प्रसिद्ध डॉक्टर ने पत्नी व दोन मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केली आणि सुसाईड नोट दरवाजाला चिटकवून ठेवली आहे त्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात अशी शंका उपस्थित होत आहे. लोकांनी हॉस्पिटलसमोर एकच गर्दी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि कर्जत तालुक्यातील राशीन येथे वास्तव्यास असणारे प्रसिध्द डॉक्टर महेंद्र थोरात (वय ४६) यांनी राहत्या घरी पत्नी व दोन लहान मुलांना गळफास देत स्वत:ही गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे.
शनिवारी पहाटे ही घटना घडली असून. गळफास घेतलेल्या खोलीच्या दरवाजाला स्टेलो टेपने डायच्या कागदावर त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती
दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत डॉक्टरने म्हटले आहे की, माझा थोरला मुलगा (वय १८) कृष्णा याला कानाने ऐकण्यास कमी येत असल्याने आम्हाला समाजात अपराध्यासारखे वाटत आहे.
अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित आहोत. कृष्णाचेही कशात मन लागत नाही. हे आम्ही वडील व आई म्हणून दुख: सहन करू शकत नाही. म्हणून मी व माझी पत्नी वर्षा (वय ३९) आत्महत्येसारखे कृत्य करत आहोत.
हे योग्य नसले तरी नाईलाजावास्तव हे कृत्य करीत आहे. यात कोणालाही जबाबदार धरू नये असा या चिठ्ठीत उल्लेख केला आहे. सर्व परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे