रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज कोणाचे ?
(शिवजयंती निमित्त अग्रलेख जरूर वाचा)
संपादकीय- डॉ.कुमार लोंढे
दि.१९ फेब्रु २०२१
आज शिवजयंती खेड्यापासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. याचा सार्थ अभिमान प्रत्येक माय भु च्या मराठी जनास हवा !
परंतु महाराज नक्की कोणाचे? हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे.जात दांडगी,धनदांडगे, कट्टरवादी,महाराज म्हणजे आमची मक्तेदारी हे उर बडवून सांगणारे महाभाग काही कमी नाहीत.अशा वलग्ना म्हणजे शिवरायास सीमित करण्याचा मनुवादी विचारसरणीचा डाव आहे.
इतिहासात सांगताना आम्ही अफजलखानचा कोथळा कसा बाहेर काढला हे मोठ्या अट्टाहासाने सांगतो.बत्तीस मण शिंहासन याचे गाजर दाखवून मराठी जणांची मांसल शरीरावरील डोकी भडकवतो.एकेकाळी सांगली मध्ये आय पी एस कृष्णप्रकाश होते त्यावेळी स्वतःला गुरूजी म्हणून घेणाऱ्यांची अवस्था काय होती हे सर्वांना ठाऊक आहे.तुम्ही वाचक म्हणाल हे उदाहरण इथे कशासाठी ? तुमचा प्रश्न खरा आहे. जेम्स लेन याने शिवाजी किंग इन इस्लामिक इंडिया नावाच्या पुस्तकात महाराजांची बदनामी केली त्यावेळी मदत करणारे कोण होते ? भांडारकर यांनी यथेच्छ माहिती पुरवली. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने महाराजांवर वार केला हा इतिहास निधड्या छातीने धर्माचे ठेकेदार का सांगत नाहीत.
शिवाजी महाराज म्हणजे गोब्राह्मण प्रतिपालक? महाराज फक्त हिंदूंचे ? महाराज फक्त मराठ्याचे? असे सांगणे याचा उद्देश काय? बहुजन प्रतिपालक ? रयतेचे राजे? मावळ्यांचे? शिवाजी महाराज असे का सांगितले जात नाही कारण या व्यवस्थेतील धर्माच्या तारणहार यास भक्त बनवायचे आहेत अनुयायी नाही हा इतिहास अधोरेखित होतो आहे.
त्यामुळे आज जयंती निमित्त आपण संकल्प करू या ! शिवरायांचे भक्त न बनता त्यांच्या विचाराचे पाईक बनून दिल्ली चे तक्त काबीज करू या!
आज एकविसाव्या शतकात महाराज आम्हाला सांगत आहेत... समस्त मावळ्यांनी परस्त्री बरोबर अदबीने वागा!तुम्ही चाकरमानी असा पण पोरांना तरबेज बनवा! जात धर्म पंथ याच्यापलिकडे राष्ट्रहित जोपासा!शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावणारे हिटलरशाहीचे हात कलम करा!
विश्वास,जिद्द व चिकाटीच्या जोरावर तुम्ही यशाची शिखरे पादाक्रांत करा! रयतेचे रक्षण करा!वर्णव्यवस्था,भांडवलशाही,बाबूशाही,भटशाही मोडीत काढा !
त्यामुळे महाराज कोणाचे हा प्रश्न निरर्थक व जात मानसिकतेचा कळस गाठणारा अजगररूपी राक्षस आहे त्याला आपण मुठमाती देऊ या व नवीन महाराष्ट्रासह देश घडवू या.