माळशिरस मधील शिवजयंती आगळी वेगळी! कोव्हीड दूतांचा सन्मान; नालंदा ट्रस्ट चे कौतुकास्पद कार्य .
माळशिरस प्रतिनिधी -रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वेगवेगळ्या उपक्रमाने साजरी होत असते .या जयंतीचे औचित्य साधून नालंदा बुद्ध विहार ट्रस्ट चे अध्यक्ष विकास (दादा) धाइंजे यांनी कोव्हीड दूतांचा सन्मान करून अनोख्या पद्धतीने जयंती साजरी केली.
शाहीर धाइंजे यांची कन्या व छोट्या चिमुकलीने आपल्या भारदस्त आवाजात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला.युवा नेते प्रदीप धाइंजे व माजी सरपंच व आंबेडकर चळवळीचे नेते विकास दादा धाइंजे यांनी ही मनोगत व्यक्त केले.
कोव्हीड कोरोना काळात
आरोग्य ,महसुल , नगरपंचायत कर्मचारी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेची सेवा केली अशा सर्व व्यक्तींना कोव्हीड योध्दा सन्मान पत्र पुरस्कार व एक रोप देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी तुकाराम भाऊ देशमुख ,आबाजी सावंत ,अशोक बापू धाईंजे,विकास दादा धाईंजे,बुवा नाना धाईंजे,प्रदीप बापू धाईंजे,डॉ. कुमार लोंढे,किरण सावंत ,राजू नाना सावंत ,नाना काळे ,पराग भोरे ,राजाभाऊ तांबोळी ,ऍड वैभव धाईंजे ,शरद धाईंजे,किरण धाईंजे ,विवेक धाईंजे,किशोर धाईंजे,इ मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अयोजन पुष्कर धाईंजे ,बुद्धभूषण धाईंजे ,सुरज धाईंजे या युवा कार्यकर्त्यांनी केले होते.