दिघंची वार्ताहर
(पोपट वाघमारे)
दिघंची तील दिव्यांगाना ग्रामपंचायती कडून देण्यात येणारा पाच टक्के निधी तत्काळ द्या अशी मागणी दिव्यांग संघटनेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अपंग सेल तालुकाध्यक्ष सोमनाथ लोहार यांनी ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडे केली आहे . परंतु सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे दिव्यांगांना पाच टक्के निधी पासून वंचित राहावे लागले आहे.
दिघंची येथे अस्थिव्यंग, कर्णबधिर, मूकबधिर, असे एकूण 100 पेक्षा जास्त दिव्यांग बांधव आहेत दिघंची हे आटपाडी तालुक्यातील सर्वात मोठे व्यापारी पेठेचे गाव असून येथे मोठ्या प्रमाणात कर वसूल होत आहे या करा पैकी पाच टक्के निधी दिव्यांग बांधवांना देण्यात येतो परंतु सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे दिव्यांग बांधवांना वंचित राहावे लागत असल्याची खंत दिव्यांग बांधवा तून होत आहे दिव्यांगाचे पैसे सरपंचांनी द्यावे अशी मागणी गेले दोन वर्ष झाले दिव्यांग संघटना करत असून ग्रामपंचायत प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. दिघंची तील दिव्यांग यांची परिस्थिती कोरोना काळानंतर अतिशय बिकट होत गेली असल्यामुळे दिव्यांगाना देण्यात येणारा ग्रामपंचायतीचा पाच टक्के निधी मिळावा अशी दिव्यांग बांधवांची मागणी आहे. परंतु दिव्यांगांना ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचा ठपका दिघंची शहर अधक्ष बाळासाहेब औंधकर यांनी केला आहे.