पूजा चव्हाण आत्महत्त्या की घातपात एक बड्या मंत्र्यासोबत प्रेम प्रकरणी; बड्या अधिकाऱ्याचा खुलासा
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
पुणे प्रतिनिधी-
पुणे येथील हडपसर परिसरात रविवारी एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. महाराष्ट्रातील एका बड्या मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून या तरुणीने आत्महत्या केल्याची चर्चा समाजमाध्यमांमध्ये सुरू आहे. पूजा चव्हाण प्रकरणामध्ये आता वेगवेगळ्या बाबी समोर येत आहेत. पूजाने तिच्या मृत्युच्या पूर्वी मद्यपान केलेले होते.
ती कठड्यावर बसलेली होती. त्यामुळे ती पडली का तिला पाडलं की तिने खरंच आत्महत्या केली आहे, याची चौकशी आता पोलिस करत आहेत.
पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. विदर्भातील एका बड्या मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून या तरुणीने आत्महत्या केल्याची चर्चा समाजमाध्यमांमध्ये सुरू आहे. या आत्महत्या प्रकरणावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारविरुद्ध टीकेची झोड उठवली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून या प्रकरणी कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे. या संदर्भात भाजप महिला आघाडीच्या वतीने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन देण्यात आले आहे.
या प्रकरणी आठवडा होत आला तरी पोलिसांकडुन अद्याप गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. यामध्ये तिच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मात्र ते सर्वजण बीड येथे आहेत. तसेच याप्रकरणात तक्रार देण्यात आलेली नाही. त्यामुळे अद्याप पोलिसांनी गुन्हा नोंद केला नसल्याचे पोलिसांकडुन सांगण्यात येत आहे.
पुणे पोलिस दलातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, " पूजा पहिल्याच मजल्यावर होती. घटनेच्या वेळी ती दारु प्यायलेली होती. आणि कठड्यावर बसली होती. त्यानंतर ती तिथून पडली. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात की अपघात या सगळ्या दिशांनी तपास होत आहे"
अर्थात या संपूर्ण प्रकरणात भाजप आक्रमक झाले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिप्स मध्ये ती ट्रिटमेंट झाल्यावर वारंवार आत्महत्या करण्याबाबत बोलत असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे आता केला जाणारा हा दावा हा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे हा असाही सवाल विचारला जातो आहे.