🎯 धर्म परिवर्तन केलेल्या दलितांना आरक्षणाचे लाभ मिळणार नाहीत—-
कायदा मंत्री रविशंकर प्रसाद🎯
📌 आरक्षणाचे लाभ
धर्मपरिवर्तन करून इस्लाम किंवा ख्रिश्चनिटी स्वीकारलेल्या दलितांना निवडणूक आरक्षणाचे लाभ मिळणार नाहीत, असं कायदेमंत्री रवी शंकर प्रसाद यांनी गुरुवारी राज्यसभेत स्पष्ट केलं आहे.
📌 आरक्षित जागांवर निवडणूक लढता येणार नाही
दलितांनी धर्मपरिवर्तन केल्यास त्यांना मिळणाऱ्या लाभाविषयी भाजपचे राज्यसभा सदस्य जी व्ही एल नरसिंह राव यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना प्रसाद म्हणाले की, धर्मपरिवर्तन करून इस्लाम किंवा ख्रिश्चनिटी स्वीकारलेल्या दलितांना लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी अनुसूचित जातींसाठी आरक्षित जागांवर निवडणूक लढवता येणार नाही.
📌 आरक्षणाचे लाभ मिळणार नाहीत
त्याचप्रमाणाने अशा दलितांना निवडणूक आरक्षणाचे लाभही मिळणार नाहीत, असं ही त्यांनी म्हटलं आहे.