पुणे प्रतिनिधी-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव फॉर्च्युनर कारची ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रेलरला पाठीमागून धडक बसून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण जागीच ठार झाले आहेत, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. भिगवण जवळ डाळज नं. २ च्या हद्दीत (ता. इंदापूर जि. पुणे) रविवारी मध्यरात्री हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, फॉर्च्युनर गाडी व त्यातील जखमींना क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढावे लागले.
याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातग्रस्त ट्रॅक्टर (एम.एच.४५ एफ.७७७९) पुण्याहून सोलापूरच्या दिशेनं निघाला होता. डाळज नं. २ येथे त्याच दिशेने फॉर्च्युनर कार (एम.एच.२४ एटी.२००४) भरधाव वेगाने येऊन ट्रेलरला पाठीमागून धडकली. या भयंकर अपघातात कारचा चक्काचूर झाला. यातील मृत्यूदेह क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढावे लागले. यात गीता माने, मुकुंद माने व अरुण माने (सर्व रा. लातूर ) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर साक्षी माने, महादेव नेटके हे दोघे जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी भिगवण व पुणे येथे पाठवण्यात आले. अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यामुळं वाहतूक व्यवस्था काही काळ ठप्प झाली होती.
Copyright©2021|www.janvidrohi.com|
Facebook page follow:जनविद्रोही www.janvidrohi.com