युवा सेना आक्रमक-अकलुज शिवसृष्टी किल्ला ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावा या मागणीसाठी प्रांताधिकारी यांना निवेदन
अकलूज प्रतिनिधी-
अकलुज शिवसृष्टी किल्ला शासकिय निधीतून 2008 साली पुनर्वसन झाला.हा किल्ला पाहायला विदेशातून पर्यटक येत आहेत.हा शिवसृष्टी किल्ला सध्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या ताब्यात आहे.किल्ला पाहायला आलेल्या पर्यटकांकडून येणारा तिकीटाचा महसूल शासनाला न जाता सत्ताधाऱ्यांच्या खासगी साखर कारखान्याला जात आहे.म्हणून ग्रामपंचायतचा प्रचंड प्रमाणात महसूल बुडत आहे.सदर किल्ला 1/1/2009 साली कोणत्याही प्रकारे टेंडर न काढता ग्रामपंचायतने ढोबळ मानाने साल न टाकता सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या ताब्यात देखरेखीसाठी दिला होता त्या कारखान्याने किल्ल्याला खूप मेंटेनेस आहे.म्हणून किल्ला पाहायला येणाऱ्या पर्याटकांकडून तिकीट वसुली चालू केली व जास्तीत जास्त किल्ल्याचा मेंटेनेस न करता त्यामार्फत फायदा कसा होईल ते बघितलं किल्ल्याच्या देखरेखीच्या नावाखाली खूप मोठा भ्रष्टाचार चालू आहे.हा भ्रष्टाचार थांबवा म्हणून अकलूजचा अभिमान असणारा शिवसृष्टी किल्ला ग्रामपंचायतीने पुनश्च एकदा आपल्या ताब्यात घ्यावा व किल्ला पाहायला असणारे तिकीट बंद करावे या मागणीसाठी युवासेना अकलुज शहराच्या वतीने शहरप्रमुख शेखर भैय्या खिलारे यांनी प्रांताधिकारी अकलूज यांना निवेदन दिले आले.या विषयी लवकरच चौकशी करू असे आश्वासन प्रांताधिकारी शमा पवार यांनी दिले अशी चर्चा झाल्याचे शेखर खिलारे यांनी सांगितले.