उपजिल्हा रुग्णालय,पंढरपूर येथे अन्याय व अत्याचार झालेल्या (सपोर्ट स्टाप) महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन सत्यशोधक संघातर्फे मा.वैद्यकीय अधीक्षक पंढरपूर यांना निवेदन देण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालयात( सपोर्ट स्टाप ) राधिका कांबळे यांच्यावर अन्याय व अत्याचार झाल्यामुळे बहुजन सत्यशोधक संघातर्फे मा.वैद्यकीय अधीक्षक यांना युवा जिल्हाध्यक्ष मा.गणेश देवकते यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. त्यावेळी ते बोलताना म्हणाले,राधिका कांबळे ही महिला उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे गेले पाच वर्षे सपोर्ट स्टाप या पदावर काम करत आहेत. तरी दिनांक २७/१२/२०२० रोजी सदर रुग्णालयामधील कपडे वाळवण्याची मशीन शॉटसर्किट झाल्यामुळे बंद पडली होती. तरी त्या विभागामध्ये इलेट्रेशन ऑपरेटर यांचे काम होते व त्यांचे कामकाज नसताना, त्या कामाची जबाबदारी त्यांच्यावर ढकलून व त्यांच्यावर दोष लावून त्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. याबाबत आम्ही स्वतः रुग्णालयात जाऊन मा. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी योग्य ते उत्तर दिले नाही, व ते म्हणाले डॉ.जयश्री ढवळे यांची नियुक्ती होति तेव्हा हे घडले आहे. आणि चवकशी कमिटी साठी सोलापूरचे डॉ.माने हे आले होते पण राधिका कांबळे ह्यांना आम्ही फोन लावला होता, पण त्यांचा फोन लागत न्हवता असे सांगण्यात आले. आता हे खरं की खोटं याचा छडा आम्ही लाऊ, व चवकशी कमिटी केव्हा व कधी आली होती व कोणत्या गोष्टीची चवकशी करण्यासाठी आली होती हे माहिती अधिकारातून कळेलच, असे सांगण्यात आले. साक्षी ओंबासे ( इंचार्ज ) ह्यांनी आम्हाला सांगितले डॉ. जयश्री ढवळे यांच्या आदेशावरून राधिका कांबळे यांना कामावरून काढण्यात आले आहे. डॉ जयश्री ढवळे यांना फोन करून विचारणा केली असता त्या म्हणाल्या माझा ह्यात काहीही संबध नाही,असे एकमेकांवर दोष दाखवून देण्याचे काम चालू आहे. सदर रुग्णालयामध्ये साक्षी ओंबासे ( इंचार्ज ) यांच्याकडून राधिका कांबळे यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते,त्यांना जातीवाचक बोलले जाते,तुम्ही झोपडपट्टीमध्ये राहणारे लोकं असून, तुम्ही थडँक्लास लोक आहात तुमच्याकडून कोणतेच काम होणार नाही अश्या शब्दामध्ये मनावर घाव करणारे शब्द साक्षी ओंबसे (इंचार्ज) यांच्याकडून बोलले जाते. त्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता व तश्या प्रकारचे कोणत्याही कागतपत्रे ना देता, कामावर कमी करण्यात आले आहे.सन २०१७-२०१८ व सन २०१८- २०१९ या दोन वर्ष्याच्या कालावधी मध्ये ८ तासाची ड्युटी असताना त्यांच्याकडून १२ तास कामं करून घेतले आहे,व त्याचा एक्स्ट्रा कामाचा मोबदला त्यांना दिला नाही. ८ तासाची ड्युटी असताना १२ तासाची ड्युटी करून घेतली आहे तशी रजिस्टर मध्ये नोंद देखील आहे.तरी एका अबला स्त्रीवर अन्याय व अत्याचार होत असून हा अन्याय बहुजन सत्यशोधक संघातर्फे खपवून घेतला जाणार नाही. तरी येत्या ८ते१० दिवसात त्यांना सन्मानाने कामावर रुजू करून घेतले नाही तर बहुजन सत्यशोधक संघातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा युवा जिल्हाध्यक्ष मा.गणेश देवकते यांनी दिला.
त्यावेळी जिल्हाध्यक्ष मा. प्रदीप परकाळे बोलताना म्हणाले राधिका कांबळे यांना जातीवाचक बोलावून त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे, व आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जात आहे तरी या बाबद साक्षी ओंबासे (इंचार्ज) व जे कोणी अधिकारी ,स्टाप वर्ग याला जबाबदार असेल यांच्यावर गुन्हा दाखल करून बेमुदत उपोषणाला बसण्यात येईल असा ईशारा मा.प्रदीप परकाळे यांनी दिला. त्यावेळी महिला जिल्हाध्यक्षा मा.ज्योती भुजंगे ह्या बोलताना म्हणाल्या ह्या महिलेला कोणाचा आधार नाही, त्यांच्या घराची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे, अश्या करोना संकटात ह्या महिलेने आपली जीवाची पर्वा न करता रुग्णालयात काम केले आहे आणि आता त्यांना कोणतिही पूर्व सूचना ना देता त्यांना कामावरून कडून टाकण्यात आले आहे असा अन्याय जर होतं असेल तर आम्ही सर्व महिला मिळून जिल्हाभर आंदोलन करू असा ईशारा देण्यात आला. त्यावेळी महिला तालुका अध्यक्षा मा.पूजा झरकर, शहर अध्यक्षा मा.अनुराधा आंबरे,विमल कदम,अनिता मोरे,कल्पना नांदरे, माधुरी पोळ,रेणुका गूळखेडकर, मीराबाई नागणे, लखन शिंदे,संदीप गवळी,बाळासाहेब यलमार,असे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते काशीलिंग रणदिवे यांनी घोषणा दिल्या.