पवार कुटुंब भटक्या विमुक्त जाती व जमातींना आपलं कुटुंब मानतात का? अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी करून सरकारचा जाहीर निषध ही केला आहे
प्रतिनिधी-भटक्या विमुक्त जमाती व जाती यांचे प्रश्न आजच्या घडीला प्रचंड गंभीर आहेत. अन्न,वस्त्र,निवारा सारखे मुलभूत प्रश्नच सुटलेले नसताना त्यांच्या स्थलांतर, उच्च शिक्षण, रोजगारा विषयीच्या चर्चा अजूनही मुख्यधारेत आल्या नाहीत. या प्रस्थापितांच्या सरकाराने कोणतेही धोरण अजून भटक्या विमुक्तासांठी आखलेले नाही. कारण काल दि. 3 फेब्रुवारीला झालेल्या विमुक्त जाती व भटक्या विमुक्त समितीच्या बैठकीत प्रधान सचिव, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग, सामाजिक न्याय विभाग या दोन्हींचे अधिकारीही बैठकीस हजर नव्हते. यावरून या प्रस्थापितांचे सरकारची भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांविषयीचा हलगर्जीपणा व टोलवाटोलवीची प्रवृत्ती स्पष्टपणे दिसते. फक्त ‘माझेच’ कुटुंब माझी जबाबदारी… हेच धोरण या काका- पुतण्याच्या सरकारचं दिसतंय.
त्यांच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या घोषणेत ते भटक्या विमुक्त जाती व जमातींना आपलं कुटुंब मानतात का? गोर-गरिब,वंचित,भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करणारं, गेंड्याच्या कातडीचं, घराणेशाही चालवण्याऱ्या सरकारचा मी जाहिर निषेध करतो.