अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जे विद्यार्थी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यास पात्र आहेत व सन २०२०-२१ मध्ये डिजिटल पद्धतीने शिक्षण घेत आहेत, त्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून यावर्षीच्या शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचे निर्देश समाज कल्याण आयुक्तांना दिले आहेत.
२०२०-२१ मध्ये विद्यार्थ्यांना ७५% उपस्थितीचा आवश्यक टप्पा गाठणे शक्य होणार नाही, यामुळे हा निर्णय घेतला आहे. विविध शिष्यवृत्ती, विद्यावेतन योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांना कोविडचा प्रादुर्भाव संपुष्टात येईपर्यंत ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल.