नोकरीला लाथ मारली,शिक्षण मुंबईत,10 हजारात व्यवसाय सुरू, आता टर्नओव्हर कोटीत; वाचा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची बातमी!
🎯 परिस्थितीस दोष देऊ नका
आपला जन्म कुठे झाला याला काही महत्व नसत! तुम्ही कुठे जन्माला आलात? तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात? तुमच्याकडे किती पैसे आहेत? यावर तुमचं यश अवलंबून नसतं. तर, तुमची कष्ट घेण्याची तयारी किती आहे?, तुमच्यात आत्मविश्वास आहे का? यावर तुमचं यश अवलंबून असतं.
हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा प्रवास आज आपण पाहणार आहोत
🎯 तुम्ही कुठे जन्माला आलात?
तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात? तुमच्याकडे किती पैसे आहेत? यावर तुमचं यश अवलंबून नसतं. तर, तुमची कष्ट घेण्याची तयारी किती आहे?, तुमच्यात आत्मविश्वास आहे का? यावर तुमचं यश अवलंबून असतं. जिद्द, आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची तयारी या भांडवलावरच बेंगळुरू येथे राहणाऱ्या एका महिलेने उत्तुंग भरारी घेतली आहे. चालू नोकरीला लाथ मारून व्यवसायात उतरण्याच्या तिच्या धाडसाची कहानी वाचून तुम्हीही थक्क व्हाल.
🎯 नीता अदप्पा असं या महिलेचं नाव आहे
नीता यांनी नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला आणि आज त्या बिझनेसमध्ये लाखो रुपये कमावत आहेत. नीता यांनी अवघ्या दहा हजार रुपयात त्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली होती. या दहा हजार रुपयांच्या बळावर आज त्या कोट्यवधीचा व्यवसाय करत आहेत.
मुंबईत शिक्षण, बेंगळुरूत व्यवसाय करत आहेत.
🎯 नीता चे कुटुंब साधारणच
त्यांचे वडील एका हर्बल प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपनीत सेल्स मॅनेजर होते. नीता यांनी मुंबईतील एका महाविद्यालयातून फार्मसीमध्ये मास्टर्सची डिग्री घेतली. त्यानंतर पुढचं शिक्षण घ्यावं, शिक्षणासाठी परदेशात जावं किंवा नोकरी करावी हे तीन पर्याय त्यांच्ंयाकडे होते. त्यांनी तिसरा पर्याय निवडत नोकरीस सुरुवात केली. पण नोकरीत त्यांचं मन रमलं नाही आणि अवघ्या सहा महिन्यातच त्यांनी नोकरीला रामराम केला. त्यानंतर त्यांनी बेंगळुरूत स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
🎯 काय आहे बिझनेस आयडिया?
1995मध्ये स्त्रियांनी नोकरी सोडून काम करणं तसं शक्य नव्हतं. कारण त्या काळात संधी खूप कमी होत्या. तरीही नीता यांनी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वापरून त्यांचा व्यवसाय वाढवला. त्यांनी या काळात प्रकृती हर्बल नावाने कंपनी सुरू केली. यावेळी त्यांना त्यांच्या कॉलेजची मैत्रीण अनिशा देसाई यांनी साथ दिली. दोघींनीही हेअर केयर, स्क्रीन प्रॉडक्ट्सवर बरंच संशोधन करून 10 हजार रुपये गुंतवून व्यवसायाला सुरुवात केली.
🎯 कसा झाला व्यवसाय सुरू
बाजारात हेअर केअर आणि स्किन केअर उत्पादने भरपूर आहेत. त्यामुळे या स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांनी खास पद्धत वापरली. त्यांनी सुरुवातीला केवळ हॉटेलांना टारगेट केलं. सुरुवातीला त्यांना बंगळुरूच्या छोट्या हॉटेलमधून ऑर्डर मिळायला लागले. मात्र, त्यावर त्या थांबल्या नाहीत. त्यांनी पंचतारांकीत हॉटेलांकडेही मोर्चा वळवला. तिथूनही त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि त्यांची उत्पादने या पंचतारांकीत हॉटेलातही जाऊ लागले. त्यामुळे त्यांचा बिझनेस आपोआपच वाढला.
🎯 असा वाढला व्यवसाय
हॉटेल सेक्टरमध्ये यश मिळाल्यानंतर त्यांनी 2011मध्ये रिटेल मार्केटमध्ये पाऊल ठेवलं. यापूर्वी त्यांनी त्यांचा व्यवसाय केवळ हॉटेलांपर्यंतच मर्यादित ठेवला होता. त्यातूनही त्यांना चांगला लाभ मिळत होता. त्यानंतर त्यांनी फेस स्क्रब, हेअर मास्क, हेअर ऑयल, शँम्पू, कंडिशिनर प्रॉडक्ट विकायला सुरुवात केली. 180 रुपये ते 300 रुपयांपर्यंत हे प्रॉडक्ट विकले जात होते. सध्या त्या त्यांची उत्पादने ऑनलाईनद्वारे विकत आहेत. अॅमेझॉन, फ्लिपकार्टसह स्वत:च्या संकेतस्थळावरूनही त्या ही उत्पादने विकत आहेत.
अशा यशोगाथा आपली ही असेल तर संपर्क करा आम्ही प्रत्येक आठवडी असे सदर चालवणार आहे
Facebook page Like करा
https://www.facebook.com/जनविद्रोही-www-janvidrohicom-100216245369247/
आमच्या वेबसाईटवर भेट द्या
www.janvidrohi.com
Whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा
https://www.facebook.com/जनविद्रोही-www-janvidrohicom-100216245369247/
Copyright©2021
( आवडल्यास नक्की शेअर करा)