प्रतिनिधी-बडगाव, 2 फेब्रुवारी : एका सज्ञान व्यक्तीसह (adult) पाच अल्पवयीन मुलांनी (minor boys raped dalit woman) एका 35 वर्षांच्या दलित महिलेवर (Dalit woman) सामूहिक बलात्कार (Gang rape) केला आहे. केवळ बलात्कार करून हे आरोपी थांबले नाहीत तर त्यांनी त्याचं व्हिडीओ चित्रण करून ऑनलाईन पोस्ट केलं. त्याच्या विक्रीची किंमत ठेवली 300 रुपये. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला (video viral) आहे.
या गुन्ह्यासंदर्भात सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. Indiatimesच्या वृत्तानुसार, पीडिता (victim) पोलिसात तक्रार करण्यास गेल्यावर गुरुवारी रात्री आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींपैकी पाच जण 15 ते 17 वर्ष वयोगटातील आहेत.
या पाचही जणांना बालगृहात पाठवलं गेलं आहे. याशिवाय यातील सज्ञान आरोपीला तुरुंगात पाठवलं गेलं आहे.
ही महिला आणि पाची मुलं शेजारी राहत असून एकमेकांना ओळखतात. मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या मुलांनी महिलेला शेतात नेलं होतं. तिथं ही संपूर्ण घटना मोबाईलवर रेकॉर्ड (recorded on mobile) केली. ही घटना कुणाला सांगितली तर व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल करण्याची धमकी त्यांनी तिला दिली. त्यामुळं ती शांत राहिली. बुधवारी यातील 19 वर्षांच्या आरोपीनं हा व्हिडिओ व्हायरल केला. त्यांनतर या महिलेला याबाबत कळालं.
बडगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सिद्धार्थ वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री एफआयआर दाखल केला गेला. तिघांना अटक झाली. पीडित महिलेनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे, की आरोपी या परिसरातील लोकांमध्ये व्हिडिओ क्लिप ३०० रुपयात विकत होते. पाच बालकांविरुद्ध कलम 376 डी, 506 तसेच एससी-एसटी ऍक्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सोबतच सज्ञान आरोपीवर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.