कोरोना संकट काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ४ महिला आयपीएस अधिकाऱ्यांना राष्ट्रीय महिला आयोगाने "कोविड वूमन वॉरियर" पुरस्कार देऊन गौरविले. पुरस्कार विजेत्यांमध्ये अमरावती शहर पोलीस आयुक्त आरती सिंह, औरंगाबादच्या अधीक्षक मोक्षदा पाटील, सोलापूरच्या अधीक्षक तेजस्वी सातपुते, मुंबई शहर - झोन ५ पोलीस उपायुक्त नियती ठाकर - दवे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
कोरोना संक्रमणाचा ' हॉट स्पॉट ' बनलेल्या मुंबईतील धारावीसह नाशिक, औरंगाबाद, सातारा जिल्ह्यात यांनी कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखून जनतेला उत्तम आरोग्य व इतर सुविधा मिळवून दिल्या. या चारही महिला पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून जनतेची सेवा केली. यांचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!