केपीजेएस नागरी अर्बन बँकचे संचालक व नूतन ग्रामपंचायत सदस्य धनाजी ( शेठ ) मगर यांचा विशेष सत्कार !
नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये गारवड मगरवाडी ग्रामपंचायत मधून निवडून आलेले नूतन ग्रामपंचायत सदस्य धनाजी ( शेठ) मगर यांचा केपीजेएस नागरी अर्बन पिलीव शाखेच्या वतीने विशेष सत्कार कार्यकारी संचालक मा.माणिक मगर-पाटील व चेअरमन डॉ.कुमार लोंढे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
अत्यंत प्रामाणिक व जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्यांनी शून्यातून गरुड झेप घेतली आहे. केपीजेएस नागरी अर्बन चे ते विद्यमान संचालक आहेत. सुरुवातीच्या काळात साधा रंग कामगार ते शेठ पर्यत चा प्रवास थक्क करणारा आहे.
गावातील सार्वजनिक कार्यात सुद्धा ते एक पाऊल पुढे असतात. साध्या व सरळ स्वभावामुळे त्यांच्यासह एकूण पाच सदस्य निवडून आले आहेत. धार्मिक, सामाजीक ,शैक्षणिक व विकास कामात पुढे राहण्याचा व गावाचा विकास करण्याचा त्यांचा मानस आहे.
विशेष बाब म्हणजे नूतन सदस्य झालेने दोन लाख रुपये ची मुदत ठेव त्यांनी केपीजेएस नागरी अर्बन मध्ये केली.
या विशेष सत्कार प्रसंगी कार्यकारी संचालक मा.माणिक मगर,चेअरमन डॉ.कुमार लोंढे,रिपाइंचे तालुका उपाध्यक्ष रणजित सातपुते,माजी ग्रामपंचायत सदस्य राघू मगर, सदाशिव निवासी प्रशाला चे प्रा.कुंडलिक साठे,प्रा.अल्ताफ पठाण दादा मगर,कुसमोड चे सुळ तसेच केपीजेस चे गोरड साहेब इ जण उपस्थित होते