जनविद्रोही प्रतिनिधी- महाराष्ट्राला सुशांत राजपुतच्या आत्महत्येचं कारण गुलदस्त्यात असताना त्याच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात बिहारचे पोलिस धन्यता मानत होते. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात क्राईम असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र त्याच सुशांत सिंहच्या भावाला भर चौकात गोळ्या घातल्याची घटना समोर आली आहे. हल्ला करणारे आरोपी फरार झाले आहेत.
सुशांत सिंह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह आणि त्याच्या एका सहकाऱ्यांवर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या आहेत. या हल्ल्यात दोघंही गंभीर जखमी झाले असून त्यांचा सहकारी अली हसन याची प्रकृती चिंताजनक आहे.
सुशांत सिह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह हा यामाहा मोटारसायकल शोरूमचा मालक आहे.
बिहारमधील सहरसा, सुपौल आणि मधेपूरा या तीन जिल्ह्यात त्याचं यामाहा मोटारसायकल शोरुम्स आहेत. ते दररोज मधेपूरा येथील शोरूम उघडण्यासाठी जात असायचे. आजही ते मधेपूरा येथे शोरूम उघडण्यासाठी जात होते. दरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाला आहे. या हल्ल्यात राजकुमार सहीत त्यांचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. यामध्ये सहकारी अली हसनची प्रकृती चिंताजनक आहे