काय तो रूबाब बाईंचा एवढा मोठा पुरस्कार घेताना पण डोक्यावरचा पदर काही खाली पडू दिला नाही ही आपली खरी संस्कृती हीच. आणि चार वर्ग जास्त शिकले की सांगतात आमची फॅशन आहे अशा लोकांच्या प्रवृत्तीला शाली मधून जोडे मारल्यासारखे ह्या माय माऊली नी केले आहे एवढ्या मोठ्या पुरस्कारासाठी या माऊलीने लुगडे घालून पुरस्कार स्वीकारला धन्यवाद माऊली त्यांचा परिचय खालील प्रमाणे#पद्मश्री_राहीबाई
राहीबाई या आदिवासी, निरक्षर. महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम अशा अकोला तालुक्यातील कोंभाळणे हे त्यांचे गाव. असा त्यांचा सुरुवातीचा परिचय. नंतरचा परिचय द्यायला सुरुवात केली की, त्यांना निरक्षर म्हणायला कोणीही धजावणार नाही असे कर्तृत्व !
काय केलंय या सामान्य बाईनं ?
अवाक व्हायला होतं त्यांच्याविषयी माहिती करून घेतल्यावर आणि विनम्रपणे हात जोडावेसे वाटतात त्यांना त्यांच्या असामान्य कामगिरीसाठी !!!
राहीबाई यांच्याकडे सर्व प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनीकडे उपलब्ध नाही. राहीबाईकडे जे बियाणे आहे ते शेकडो वर्षे आपले पूर्वज खात होते ते मुळ स्वरूपात आहे. त्यांच्याकडे फक्त वालाचेच वीस प्रकार उपलब्ध आहेत. त्यांनी तीन हजार महिला व शेतकरी यांचा बचतगट बनवलाय. त्यांच्या मार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते. हे पारंपरिक चविष्ट व नैसर्गिक बियाणे मुळ नैसर्गिक स्वरूपात जगात कोणत्याही कंपनीकडे नाही.
सध्या आपल्याला ज्या भाज्या मिळतात त्यांच्या बियाण्यांचे उत्पादन आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी केलेले आहे. ती संकरित बियाणे असून त्यांचे yield जास्त असल्याने सर्व शेतकरी त्याचे उत्पादन घेतात. दुर्दैवाने commercial सोडा, परंतु घरी वापरण्यासाठी सुद्धा शेतकरी हे पारंपारिक उत्पादन घेत नाही.
आज अशी परिस्थिती आहे की, या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु राहीबाईंनी ‘सीड बँक’ उभारली असून राहीबाईंच्या बँकेत आदिवासी परंपरेने जपलेल्या ५३ पिकांचे ११४ गावरान वाण आहेत. अहमदनगरच्या अकोलेसह चार तालुक्यात ५० टक्के शेतकरी हे गावरान बियाणे वापरतात.
विशेष म्हणजे प्रत्येक बियाणाविषयीची माहिती राहीबाईंना तोंडपाठ आहे. देशभरातून ‘कृषी तंत्रज्ञान’ शिकणारे अनेक विद्यार्थी त्यांचा हा प्रोजेक्ट बघायला येतात. संपूर्ण जगातील हा अशा प्रकारचा एकमेव प्रोजेक्ट आहे.
त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे.
त्यांच्या या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना भारत सरकारचा गतवर्षीचा ‘ पद्मश्री ‘ पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.
Copyright © 2021
Janvidrohi.com