दिघंची वार्ताहर- (ईकबाल आतार)
दिघंची येथील दिव्यांग बांधवांचा दिव्यांग पाच टक्के निधी दिघंची ग्रामपंचायतीने द्यावा असे निवेदन दिव्यांग दिघंची शहर अध्यक्ष बाळासाहेब औंधकर यांनी दिघंची ग्रामपंचायत प्रशासनाला दिले आहे. यावेळी राष्ट्रवादी तालुका अपंग सेलचे अध्यक्ष सोमनाथ लोहार ,विठ्ठल मोरे ,किरण जाधव, किशोर जावीर ,अण्णासाहेब चव्हाण, बाळासाहेब चव्हाण मिथून पवार धनंजय भांबूरे गंगाधर मोरे नंदकुमार साठे उपस्थित होते. या निवेदनात पुढे म्हटले आहे की 2018 ते 2020 पर्यंत दिघंची ग्रामपंचायतीकडून चार लाख वीस हजार इतका दिव्यांग निधी प्रशासकीय अधिकारी यांनी दिव्यांग बांधवांच्या समोर हा निधी काढला होता त्यापैकी 77 दिव्यांगांना 114000 एवढा निधी त्यांच्या बँक खात्यावर जमा केला होता पण अजून तीन लाख सहा हजार दिव्यांग निधी ग्रामपंचायतीकडे शिल्लक आहे तो निधी ग्रामपंचायतीने लवकर दिव्यांगाच्या बँक खात्यावर जमा करावे असे निवेदन ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात आले.यावेळी तुकाराम तुपे शिवाजी टिंगरे व दिव्यांग बांधव उपस्थित होते.