प्रतिनिधी- पोपट वाघमारे
सांगली जिल्ह्यात पिटा ॲक्टची मोठी कारवाई बडा अधिकारी सापडला : सांगली जवळ कर्नाळ रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल रणवीर येथे सांगली पोलिसांची धडक कारवाई : कारवाईत सहा संशयित अटकेत : दोन तरुणींची महिला सुधार गृहात रवानगी : हाय प्रोफाइल वेश्या अड्डा उध्वस्त
सांगली शहरा जवळील कर्नाळ रोड येथील हॉटेल रणवीर मध्ये सुरू असलेला हाय प्रोफाइल वेश्या अड्डा उध्वस्त करण्यात आला. एका पोलिस निरीक्षकासह 6 जणांना अटक करण्यात आली. तर दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आटपाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण देवकर, हॉटेल मालक राघवेंद्र शेट्टी, रवींद्र शेट्टी, राजेश यादर, शिवाजी वाघले, सत्यजित पंडित अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर दोन महिलांची महिला सुधार गृहात रवानगी केली आहे. दरम्यान वेश्या अड्ड्यावर पोलिस निरीक्षकाला अटक झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक मायादेवी काळगावे यांनी फिर्याद दिली आहे. कर्नाळ येथील हॉटेल रणवीर येथे वेश्या अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्यासह पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.
copyright©2021 janvidrohi.com
janvidrohi@gmail.com