काँग्रेस पक्ष आणि मोहीते-पाटील हे जुनं समीकरण आहे सहकार महर्षिंनी काँग्रेस मधुनच सहकाराचा पाया रचला, तर वडील प्रतापसिंह यांचीही काँग्रेस पक्षाशी नाळ जुडलेली होती.सहकार महर्षि व लोकनेते पप्पासाहेब यांचेकडून जनसेवेची प्रेरणा मिळाली आहे.विचारधारा व तत्वाशी बांधील राहणारा काँग्रेस पक्ष आहे.काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून यापुढे सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशिल राहीन– डाँ. धवलसिंह मोहीते-पाटील
सोलापूर जिल्ह्यात ज्याप्रकारे नरभक्षक बिबट्याला टिपलं त्याप्रमाणे जिल्ह्यातील भाजपला टिपा व जिल्हा परिषदेवर कांग्रेसचा झेंडा फडकवा काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी भक्कम उभा राहील असे प्रतिपादन काँगेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
डाँ.धवलसिंह मोहीते-पाटील,सौ.उर्वशीराजे मोहीते-पाटील यांनी आपल्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.मुंबई येथिल टिळक भवन प्रदेश काँग्रेस कमेटीच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष थोरात यांचे नेतृत्वाखाली जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला.याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे,खा.हुसेन दलवाई,आ.धिरज देशमुख,मोहन जोशी,रत्नाकर महाजन,जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
.पुढे बोलताना नामदार थोरात म्हणाले डाँ.धवलसिंह धाडशी व विनयशिल तर आहेतच शिवाय त्याच्याकडे अचुक निर्णय घेण्याची क्षमताही आहे.काँग्रेस पक्षात प्रवेश करुन त्यांनी स्वगृही येण्याचा योग्य निर्णय घेतला आहे.भविष्यात तुमचे नेतृत्व देश व राज्य पातळीवर गाजणार आहे,सुरुवात छोटी असली तरी भविष्य मोठे आहे.
यावेळी बोलताना सुशिलकुमार शिंदे म्हणाले डाँ.धवलसिंह यांनी बिबट्या मारला त्याचे नाव सर्वत्र झाले त्यांच्याकडे नेतृत्व,कर्तृत्व आणि दुरदृष्टी असून त्याच्यामागे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे.दुरदृष्टीचे युवा नेतृत्व काँग्रेसला मिळाले आहे.डाँ.धवलसिंह हे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करतील.
यावेळी बोलताना आ.धिरज देशमुख म्हणाले सहकार महर्षि शंकरराव मोहीते-पाटील हे काँग्रेसच्या विचाराशी जुडलेलं नेतृत्व होतं,आज पुन्हा डाँ.धवलसिंहाच्या रुपाने सहकार महर्षिंच्या घराण्याची नाळ काँग्रेसच्या विचाराशी जुडली आहे.