बारामती प्रतिनिधी -भारताच्या संविधानाप्रती जागरुकता निर्माण व्हावी,भावी पिढ्यांना प्रेरणा मिळावी या भावनेतून बारामती लोकसभा मतदारसंघातील नगरपालिका, नगरपरिषदा आणि महापालिकेच्या क्षेत्रात संविधान स्तंभ उभारले आहेत.हा उपक्रम अतिशय प्रेरणादायी असून तो राज्यभरात राबविण्याची आवश्यकता आहे.
यासाठी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आपणास नम्र विनंती आहे की,कृपया महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासकीय अथवा निमशासकीय जागेवर संविधान स्तंभ उभारण्याबाबत आपण सकारात्मक विचार करावा.संविधान व लोकशाही व्यवस्थेप्रती सजग नागरिक घडविण्यासाठी हे आवश्यक आहे.
आपण यावर नक्की सकारात्मक निर्णय घ्याल हा विश्वास आहे.
#CMOMaharashtra
#UddhavThackeray