नातेपुते (प्रतिनिधी)-पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल च्या वतीने द्वितीय वर्धापन दिन व सावित्री जिजाऊ जयंती महोत्सव निमित्त ऑनलाइन राज्यस्तरीय चित्रकले स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना तसेच आदर्श शिक्षक व सामाजिक औद्योगिक विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या शिक्षक व मान्यवरांना विविध पुरस्कार अकलूज स्मृती भवन येथे वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ॲड.डॉ. केवल उके., माजी आमदार रामहरी रुपनवर विकास दादा धाईंजे रिपाई राष्ट्रीय नेत्या शीलाताई गांगुर्डे पं.स. माळशिरस माजी सभापती वैष्णवी देवी मोहिते-पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, एन डी एम जे राज्य सचिव वैभव गिते, पीएस खांदारे पं स सदस्य अजय सकट ऍड हसीना शेख, ऍड.अमोल सोनवणे, बापूसाहेब शीलवंत,सुमित सावंत, डॉ.कुमार लोंढे,संदीपसेठ नरोळे,अँपल खरात, आदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
पुरोगामी महाराष्ट्र चॅनल ने महाराष्ट्र शासनाच्या झाडे लावा झाडे जगवा अभियानात सहभागी होऊन महाराष्ट्रभरात दीड लाख पुरुषांचे वृक्षारोपण केले आहे. तसेच स्वच्छता अभियान बेटी बचाव बेटी पढाव जलशक्ती अभियान राबवले आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रंगभरण स्पर्धा चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे या स्पर्धेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कोरोना काळात तंत्रज्ञानाचा वापर करून मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
तसेच कोरोना काळात भुकेल्यांना अन्नदान केल्याबद्दल सीमाताई रामदास आठवले यांना राष्ट्रमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार तर सामाजिक क्षेत्रात लोकांना विविध ठिकाणी मदत केल्याबद्दल पंचायत समिती सभापती वैष्णवी देवी मोहिते-पाटील यांना सावित्रीबाई फुले आदर्श समाजसेविका पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच राष्ट्रीय नेत्या शीलाताई गांगुर्डे यांनासुद्धा सावित्रीबाई फुले आदर्श समाजसेविका पुरस्कार देण्यात आला.सामाजिकऔद्योगिक विविध क्षेत्रात ल्लेखनीय काम करणार्या मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांनी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या कामाचे व आयोजित कार्यक्रमाचे कौतुक केले या कार्यक्रमास अनिलभाई गांगुर्डे, महानंदा ताई डाळिंबे,पंचशीलाताई कुंभारकर, संपादक श्रीकांत बाविस्कर,अनिल तांबे,अभिमन्यू आठवले,श्रीनिवास कदम,नागेश लोंढे, रजनी साळवे, संजय हुलगेव आजिनाथ राऊत माळशिरस तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रातील मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन संपादक प्रमोद शिंदे का.संपादक प्रशांत खरात यांनी केले होते. सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशीसर,औदुंबर बुधावले सर यांनी केले. कार्यक्रमास विशेष आकर्षण सिने पार्श्वगायिका नयन पुणेकर,अभिनेता भीमासेन चव्हाण,बाल अभिनेत्री राशी शिंदे हे होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रतिनिधी औदुंबर पवार, विनोद रोकडे,संदेश भालेराव, प्रज्ञा कांबळे, मोहन शिंदे,सागर पवार,आदित्य साळवे,साई सेवा दल कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.