विशेष प्रतिनिधी (राजू खरात)
कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या लसीकरणाचा शुभारंभ केला. मात्र यावरून ही आता राजकारण होताना पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधी ही लस घ्यावी, त्यानंतर मी घेईन, असा पवित्रा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आज औरंगाबादेत आज पत्रकार परिषद घेतली होती.
कोरोनाची लस आपण घेणार आहात का? पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘आधी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस घ्यावी त्यानंतर मी लस घेईल’ तसेच औरंगाबादच्या नामकरणाबाबत प्रश्न विचारला असता “नामकरणावरून सुरू असलेल्या या वादाबाबत औरंगाबादेतील जनतेचे मतदान घ्यावे. त्यानंतर निर्णय घ्यावा” असे ते म्हणाले.