केंद्रीय मानवाधिकारव संघ च्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत सांगोला येथील उत्कर्ष विद्यालयाचा विद्यार्थी ऋषिकेश पैलवान प्रथम !
केंद्रीय मानव अधिकार संघ दिल्ली व सोशल संस्थेने कोरोना कालावधीत शालेय विद्यार्थ्यांच्या अंतर्भूत कला- गुणांना वाव देण्याचा उद्देशाने Education SNP Guru या शैक्षणिक चॅनल च्या माध्यमातून ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन केले होते .
सदरच्या स्पर्धेत सोलापूर सातारा पुणे येथील स्पर्धकांनी भाग घेतला होता. या सर्व स्पर्धकामध्ये सर्वात जास्त दर्शकांनी ऋषिकेश पैलवान याच्या व्हिडीओस पसंतिक्रम दर्शविला.सदरचा विद्यार्थी सांगोला येथील उत्कर्ष विद्यालयाच्या असून त्याने या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला . त्याच्या या यशाबद्दल सेंट्रल ह्यूमन राईट च्या वतीने सन्मानचिन्ह ,गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्र देऊन संस्थेच्या कार्यालयात ह्यूमन राईट चे अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे व उत्कर्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील कुलकर्णी यांच्या हस्ते सदर विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या यशाबद्दल माता बालक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मा. डॉ.संजीवनी केळकर वर्गशिक्षिका सौ रेखा दौंडे म्याडम,नागरी अर्बन चे संचालक बाळासो काटे पालक ,शिक्षक व शाळा समिती यांनी ही सदर विद्यार्थांचे अभिनंदन केले.