आदरणीय मुख्यमंत्री बघा वेळ मिळाला तर आमचा वडार समाजाचा वकीली करणारा आंबेडकरवादी तरुण जुलमी व्यवस्थेचा बळी ठरला आहे.खाकी वर्दीचा सन्मान आहे परंतु खाकी वर्दी घालून मानवतेला काळीमा फासणार व सोमनाथ सुर्यवंशी ची हत्या करणार हे चालणार नाही.
हजारो भीम सैनिक माता माय माउली थंडीच्या दिवसात परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढून न्याय मागत आहेत.मुख्यमंत्री महोदय आपण राज्याचे गृहमंत्री आहात अत्यंत चांगल्या पद्धतीने खोटं ही बोलत आहात यात शंका असण्याचे कारण नाही.आदमी आदतो का गुलाम होता है असं मी एकले आहे व ते खरे ही आहे.संविधान प्रतिकृती ची तोडफोड होते किती भाजप च्या लोकांनी या घटनेचा निषेध केला हा नेहमीच संशोधनाचा विषय आहे.
आपण विधानसभेत निवेदन करता की संविधान प्रतिकृतीची विटंबना करणारा तो मनोरुग्ण आहे .आपणास किती विस्तृत व कल्पोकल्पित डोके चक्रवणारी माहिती आपले इमानदार लोक देत आहेत दुसरे म्हणजे आपण विधानसभेत उत्तर दिले की सोमनाथ सुर्यवंशी याला मारहाण झालीच नाही म्हणजे त्याची माई जी आर्त हाक देते आहे ती व्यर्थ आहे ती खोटी बोलत आहे आणि आंबेडकरी लोक सुद्धा काही काम नाही म्हणून उगीच फॅशन म्हणून मोर्चे काढत आहेत कारण आपले देशाचे गृहमंत्री बोललेच आहेत डॉ आंबेडकर म्हणजे फॅशन आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा या तमाम लोकांच्या आक्रोशास फॅशन समजत असाल तर याच्यापेक्षा द्रोह काय असू शकतो आपल्या या कृत्याने लोकांना खात्री होत आहे समस्त जनतेला व आपल्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या आंबेडकरी नेत्यांना व बहुजन आंबेडकरी समुदायास मूर्ख बनवत आहात असा समज आपल्या बाबतीत होणे स्वाभाविक आहे
सोमनाथ च्या माऊली चे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत आपण म्हणजे राज्य सरकारने दिलेली मदत या माऊलीने नाकारली .मुख्यमंत्री महोदय तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर व्यक्तिगत रित्या शरमेने मान खाली घालावी लागणारी ही बाब आहे .भले आम्ही उपाशी असू,भले ही आम्ही शूद्र असू, भले ही आम्ही अतिशूद्र असू, भले ही आम्ही अज्ञानी असू,भले ही आम्ही अठरा विश्व दारिद्र्यात असू पण आम्ही स्वाभिमानी व कष्टाची भाकर खाणारे आहे. दयेवर जगणारी आमची मती व जाती ही नाही.
भाजप बरोबर असणाऱ्या सवतःला आंबेडकरी म्हणवून घेणाऱ्या आंबेडकरी नेत्यांना व तालुक्या तालुक्यात भाजप व संघाचा उदोउदो करणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना विनंती आहे तुमच्या तालुक्यातील आमदार खासदार आहेत त्यांना जाब विचारा तरच यांचा सत्तेचा आलेला मग्रूरपणा मस्त्वाल पणा गळून पडल्याशिवाय राहणार नाही.
आमच्या सोमनाथ सुर्यवंशी ची आई टाहो फोडून साश्रू नयनांनी,जीवाचा आटापिटा करून श्वास मुठीत धरून न्याय मागते आहे..माय बाप सरकार देवेन्द्रजी न्याय द्या हो न्याय द्या हो...कोणी न्याय देता का न्याय..
कुमार लोंढे
मो.7020400150
चांदापुरी सोलापूर
दि:१८/०१/२०२५