प्रतिनिधी,
भोसे गावचे विद्यमान सरपंच, युवकांचे आशास्थान, जनरल बाॅडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा मा. श्री. ॲड. गणेश (दादा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कन्सेप्ट कोचिंग क्लासेस चे संचालक श्री. साईनाथ कुंभार(सर)व श्री.विकास शेळके(सर) यांचे वतीने प्रसाद पाटील,श्री.अनिल तळेकर,श्री.उत्तम कोरके यांचे हस्ते जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी मध्ये राजगिरा लाडू चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक,अंगणवाडी सेविका,कन्सेप्ट क्लासचे सह शिक्षक श्री. निसार शेख सर श्री. कौलगे सर व ऋषिकेश कुंभार, सुरज थिटे, विक्रम कुंभार, विनायक कुंभार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.