सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज,नालंदा सायन्स गुरुकुल अकॅडमी चांदापुरी (ता. माळशिरस सोलापूर) येथील विद्यार्थी परदेशात शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहून गावाची व देशाची सेवा करू शकतात असे ठाम मत सेंट्रल ह्युमन राईट संघटन दिल्ली चे युथ व्हा प्रेसिडेंट संकेत थोबडे यांनी प्रशालेत व्यक्त केले
यावेळी बोलताना ते म्हणाले तुम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थी आहात या शाळेत कॉलेज मध्ये पुणे मुबई येथून विद्यार्थी निवासी आहेत.तुम्ही जगाच्या स्पर्धेत मागे राहू नका सोशल मीडिया पासून दूर रहा,मी यु के (UK) मध्ये माझे इंजिनिअरिंग चे शिक्षण पूर्ण केले आहे. केवळ शिक्षणामुळे आपली प्रगती होऊ शकते.
मी देशपातळीवर सेंट्रल ह्युमन राईट मध्ये डॉ.लोंढे साहेब यांच्याबरोबर काम करतो आहे शैक्षणिक बाबतीत पाचशे विद्यापीठ व साठ हजार कोर्सेस साठी तुम्हाला प्रचंड संधी आहे तुम्हाला संधीच सोन करावे लागेल मी नेहमीच आपल्या सोबत असेल असे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला व संस्थेस जी मदत लागेल ती मदत करणार असल्याचा शब्द ही त्यांनी यावेळी दिला.
डॉ.कुमार लोंढे म्हणाले माणसाचे मोठेपण हे पैशात नसते ते शिक्षण,शिल, सदाचार व आचरणात आहे.संकेत थोबाडे हे उद्योजक, इजनियर, हॉटेलिंग सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत ते परदेशात स्थिर झाले असते परंतु देशाची सेवा करण्यासाठी ते भारतात आले आहेत.
रतन टाटा यांच्या विचाराचे ते वारसदार आहेत कारण त्यांचेकडे शील आहे व मला ही अभिमान आहे माझ्याबरोबर हत्तीचे बळ असणारे संकेत थोबाडे सारखे लोक बरोबर आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तुमची प्रगती फक्त शिक्षण शिक्षण आणि शिक्षण यामुळेच आहे.
संस्थेचे प्राचार्य आर वायदंडे यांनी सेंट्रल ह्युमन राईट चे व्हा प्रेसिडेंट संकेत थोबडे,राज्य संघटक श्रेयस पाटील ,जिल्हा अध्यक्ष बंटी पवार यांचा सत्कार केला. कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन सेंट्रल ह्युमन राईट नॅशनल प्रेसिडेंट डॉ.कुमार लोंढे प्रा. डी कारंडे, प्रा एन सरक, प्रा ए पठाण, गायकवाड ए बी,अरुणा मॅडम,गायकवाड सर ई मान्यवर उपस्थित होते.