मोडनिंब,
मोडनिंब प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी प्रथमेश पवार उपाध्यक्ष वाघ, सचिव ओहोळ मोडनिंब प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी प्रथमेश पवार, उपाध्यक्षपदी प्रताप वाघ तर सचिवपदी बाळासाहेब ओहोळ यांची निवड करण्यात आली.
क्लबचे माजी सचिव वीरन कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. सर्व पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मारुती वाघ, रमेश शिरसाठ,वीरण कुलकर्णी, विजय खेलबुडे, बाबूराव जाधव, तानाजी इंगळे, प्रताप वाघ, विजय परबत, सतीश निंबाळकर संतोष पांढरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघ यांनी केले तर आभार पवार यांनी मानले.