माळशिरस तालुक्यातील चांदापुरी (जि.सोलापूर) येथे बेशिस्त वाहतूक अवजड वाहने,पिलिव माळशिरस रस्त्याचे अर्धवट काम, ठेकेदारांचे व बांधकाम विभाग याचे अर्थपूर्ण सबंध असे अनेक मुद्दे या निमित्ताने समोर येत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की चांदापुरी येथे ओंकार शुगर कारखाना असून या कारखान्याचे चेअरमन बोत्रे पाटील आहेत.या कारखाना परिसरात उसाची वाहने ते पण ओव्हरलोडअसतात ही वाहने पूर्ण रस्ता अडवून ठेवतात याचा परिणाम म्हणून धनाजी चंद्रकांत मगर राहणार निमगाव या युवकाचा अक्षरशः उसाच्या ट्रॅक्टर चाकाखाली डोक्याचा चेंदामेंदा झाला या मृत्यमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.काही दिवसापूर्वी पीलिव येथे एक युवतीचा असाच मृत्यू झाला होता. चांदापुरी येथून एखादा पेशंट घेऊन तातडीने अकलूज येथे जायचे असेल तर तास तास ताटकळत थांबवे लागते आहे.
कारखान्याचे चेअमन,MD या युवकाचा मृत्यू ची गंभीर दखल घेतील काय?RTO या परिसरातील वाहनांना शिस्त लावतील काय? पिलीव येथील पोलीस प्रशासन कारवाई करतील काय? ,बांधकाम विभाग जागा होईल काय?ऊस वाहतूक,अवजड वाहने यांना शिस्त लागले काय? हे प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारले जात आहेत.अनेक शाळकरी मुलांचा पालक व मुले सुद्धा जीव मुठीत घेऊन वावरताना दिसत आहेत.
यावंर कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास लोकांना घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा ह्युमन राईट चे प्रेसिडेंट डॉ.कुमार लोंढे यांनी दिला आहे. लोकांचे जीव शाळकरी मुलांचा प्रश्न महत्वाचा असल्याने प्रशासनाने जागे व्हावे अन्यथा लोकांचा उद्रेक झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार असेल तेव्हा कारवाई अपेक्षित आहे .