चांदापुरी (माळशिरस) येथे नालंदा सायन्स गुरुकुल अकॅडमी चे उदघाटन संपन्न…!
प्रतिनिधी -माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथे नालंदा सायन्स गुरुकुल अकॅडमीचे उदघाटन माजी सरपंच भजनदास चोरमले,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र देठे सरपंच जयवंत सुळ,संस्थापक डॉक्टर कुमार लोंढे यांच्या हस्ते संपन्न झाले सुरुवातीस डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उदघाटक माजी सरपंच भजनदास चोरमले म्हणाले डॉक्टर कुमार लोंढे यांनी नालंदा सायन्स गुरुकुल अकॅडमी, सदाशिव देठे निवासी प्रशाला व कॉलेज,इंग्लिश स्कूल ही सुरू केले आहे.या ठिकाणी शिक्षणा बरोबर बुद्धीला चालना दिली जाते म्हणून हे केंद्र बुद्धीला चालना देणारे केंद्र आहे या केंद्राच्या माध्यमातून अनेक मुलं घडतील घडत आहे ते नुसते शिक्षणच देत नाहीत तर बारावीनंतर सुद्धा विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर करावयासाठी मार्गदर्शन करतात या शाळेसाठी मी कॉलेज साठी मी पाहिजे तेवढी मदत करण्यास तयार आहे मी बरं नव्हे तर खरं बोलणारा कार्यकर्ता आहे शाळेसाठी प्रोजेक्टर,खुर्च्या ,सायकल असे दीड लाख रुपये किमतीचे साहित्य देणार असल्याचे सांगितले.
संस्थेच्या सचिव डॉक्टर पंचशीला लोंढे म्हणाल्या की,आज फाउंडेशन ची गरज विद्यार्थ्यांना का लागत आहे कारण मुलांचा बेसिक पाया पक्का नाही.पालकांनी यावर विचार करणे गरजेचे आहे प्रा. प्रवीण सरतापे म्हणाले डॉ.कुमार लोंढे यांच्यावर येथील लोकांनी विश्वास ठेवावा मला खात्री आहे एक दिवस नक्कीच ही अकॅडमी शाळा, कॉलेज क्रांती करेल! मी या गावांमध्ये शिकवले पण तेच ज्ञान हे शहरांमध्ये लाखो रुपये घेऊन देतो आहे ते तुम्हाला येथे नाम मात्र मी मध्ये डॉक्टर कुमार लोंढे यांच्या माध्यमातून मिळत आहे .
प्रा. धनाजी कारंडे म्हणाले मी शहरी भागात नीट/जेइई आणि स्पर्धा परीक्षा सारख्या परीक्षेसाठी अभ्यास शिकवला आहे.तोच अभ्यास येथे शिकवत आहे. एन.एम.एम एस सारख्या स्पर्धा परीक्षेचा निकाल शंभर टक्के आहे. प्रा.नितीन सरक सर म्हणाले शाळा,कॉलेज आणि अकॅडमी च्या माध्यमातून ग्रामीण भागातून जास्तीत जास्त मुले निर्माण करत आहोत .आम्ही मुलांना स्वतःच्या पायावर उभा करत आहे त्यासाठी पालकांनी काळजी करण्याचे काम नाही फक्त विद्यार्थ्यांवर लक्ष द्यावे.
या प्रसंगी संस्थेचे डॉक्टर कुमार लोंढे म्हणाले मी सुद्धा प्रतिकूल परिस्थितीत शिकलो आहे शाळेचा जर त्यावर्षी शंभर टक्के निकाल आहे. दहावीचा बारावीचा शंभर टक्के निकाल लागलेला आहे. हॉटेल मॅनेजमेंट,फार्मसी ,आय टी ,मेडिकल फील्ड अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सदर कॉलेजची मुले जात आहेत.तुम्ही फक्त विश्वास ठेवा तुमची मुले घडवण्याची जबाबदारी आमची असेल ही हमी देतो आहे.
या कार्यक्रमासाठी लेबर अलायन्स जिल्हाध्यक्ष रणजीत सातपुते, रीपाई चे अण्णा भोसले वंचित चे समाधान साबळे,ग्रामपंचायत सदस्य सरतापे, सोसायटीचे माजी चेअरमन सरतापे, युवराज वाघमारे,महादेव गुरुजी,सतीश सरतापे,दिनेश गाडे अक्षय देठे ,समाधान खरात व बहुसंख्या पालक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक के साठे,प्रा. राजेश वायदंडे ,प्रा.अल्ताफ पठाण, गणेश पवार काळे मॅडम अरुणा मॅडम इत्यादींनी परिश्रम घेतले