पंढरपूर(१४ एप्रिल),
शाहू-फुले-आंबेडकर बहुउद्देशीय समाजसेवी संस्था मोडनिंब शहर यांच्या वतीने महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त पालवी संस्था पंढरपूर शहर तेथे जाऊन दोनशे ते आडीशे विद्यार्थीना फळे,व शेंगदाणे लाडू,बिस्कीट ,वाटप करून अनोख्या पद्धतीने बाबासाहेबाना अभिवादन करण्यात आले.
त्यावेळी प्रमुख उपस्थित शाहू-फुले-आंबेडकर बहुउद्देशीय समाजसेवी संस्थापक अध्यक्ष मा.प्रमोद (दादा) गाडे,युवा उद्योजक मा.उल्हास (भैय्यासाहेब) खरे,युवा नेते मा.प्नताप(दादा) रणदिवे, सामाजिक कार्यकर्त मा.प्नसाद फडतरे,आदी वाघमारे,अभिषेक गायकवाड, अक्षय लंकेश्वर, संकेत गाडे,शेखर पाटोळे, रोहित ओहोळ व सर्व मित्र परिवार उपस्थित होते