मोडनिंब (१४एप्रिल),
मोडनिंब गटातील भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करून विचार विनिमय बैठक घेण्यात आली.
यावेळी खासदार साहेबांना निवडून आणण्यासाठी प्रचार यंत्रणा राबविणे तसेच केंद्र सरकारने राबविलेल्या लोककल्याणकारी योजना आणि खासदार साहेबांनी मतदार संघात केलेली विकासकामे जनतेपुढे मांडणे,बूथ यंत्रणा आणि पुढील नियोजन तसेच मित्र पक्षांना सोबत घेऊन प्रचार यंत्रणा राबविने यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी भाजपा किसान प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन दादा गडधरे,भाजपा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राहुल दादा केदार,भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य धनाजी भाऊ लादे,उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष मुरली लाडे,मोडनिंब शहर अध्यक्ष रवी दादा जाधव,नवनाथ मोहिते,सुभाष सुर्वे,प्रताप व्यवहारे,विठ्ठल मोरे,अमोल काटकर,चंद्रकांत ओहोळ,विशाल पाटील,भारत घोडके,चंद्रकांत सुर्वे,चंद्रकांत लोकरे,शिवाजी इंगळे,गणेश सुर्वे,हनुमंत सुर्वे,अमोल गडधरे,मोडनिंब शहर अध्यक्षा रोहिणी मोहिते,शुभांगी गडधरे,कुसुम जाडकर तसेच पत्रकार मारुती वाघ, विरेण कुलकर्णी आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.