श्रीपूर,
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
एका अविद्येने ब्राह्मणेतर शूद्र -अतिशूद्र यांचे किती मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हे सांगणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आज सर्वत्र साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली.
सदर कार्यक्रमसाठी जयंती उत्सवाचे अध्यक्ष अमित उघडे,उपाध्यक्ष सिद्धार्थ भोसले ,खजिनदार ऋतिक मुलाणी, निखिल उघडे, निखिल ढवळे, सोमनाथ मंडले, अथर्व गायकवाड, सागर पाटोळे, जावेद आतार, करण जाधव, सूर्यकांत बनसोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सालाबादाप्रमाणे याही वर्षी आम्ही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती पासून ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्यंत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून महामानवाना अभिवादन करतो आहोत, असे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रहीम भाईजी शेख यांनी आपल्या मनोगतमध्ये सांगितले.
यावेळी मोठ्या संख्येने भिम अनुयायी उपस्थित होते.