नमस्कार !
आपल्या सर्वांना माहीतच असेल लॉकडाऊन मध्ये आणि बऱ्याच वेळा अनियमितपणे पेमेंट केल्यामुळे आपला CIBIL SCORE कमी होतो .
काय कारणे आहेत आणि सिबिल स्कोर वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे हे आपणास माहीत असायला हवे आहे
1) क्रेडिट कार्ड मर्यादित वापर
आपण क्रेडिट कार्ड वापरतो त्यामध्ये खर्च जो करतो आहे ते लिमिट 30 ते 40 टक्के पर्यंत करा .क्रेडिट कार्डचे पेमेंट वेळेच्या वेळेला जमा करणे महत्त्वाच आहे.क्रेडिट कार्ड ची खर्च.मर्यादा वाढवून घ्या
2) कर्ज कोणते घ्यावे
कर्ज घेताना आपण विचार केला पाहिजे की आपण सिक्युअर लोन घेतो का अनस्विक्युर लोन घेत आहोत जर तुमच्याकडे लोन असतील तर ते लवकरात लवकर पेड करण्याचा प्रयत्न करावा त्यामधे अनसिक्युअर लोन अगोदर पे करा
3)कर्जाचे हप्ते/ पेमेंट्स हे वेळच्या वेळेला केले पाहिजेत
जसे की तुम्ही टीव्ही, फ्रिज ,मोबाईल या वस्तू घेता त्याचे पेमेंट वेळच्या वेळेला आपण करणे महत्त्वाचे आहे.त्यामुळे स्कोअर तुमचा वाढू शकतो
4)NFBC कडे रजिस्टर आहेत का
ज्या बँका ज्या फायनान्स कंपन्या आरबीआय कडे रजिस्टर नाहीत अशा ठिकाणी आपण लोन साठी अप्लाय करू नये आणि जे ऑनलाईन ॲप आहेत याची माहिती घ्यावी की हे खरंच NFBC कडे नोंद आहेत का नाही आणि असतील तरच आपण कर्ज घ्यावं अन्यथा अशा गोष्टींमध्ये अडकु नये.
5) लोन इन्क्वायरी जास्त करू नका
आपण लोन साठी अनेकदा अनेकवेळा मोबाईल वरून अनेक ठिकाणी कर्जासाठी सर्च करतो पण असे करू नका
6) OTS करू नये
बऱ्याच वेळा आपण कर्जाची झेंजेट नको म्हणून कर्ज भरण्यासाठी सेटलमेंट करतो पण असे केल्याने आपल्या कर्जाच्या हिस्ट्री मध्ये सेटलमेंट उल्लेख झाल्याने आपणास बँक व फायनानस कंपनी लोन देणार नाहीत त्यामुळे OTS करू नये.
तुमचा (CIBIL) सिबिल स्कोर वाढवण्यासाठी हे सर्व फायदेशीर आहे .मला वाटतं या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपला स्कोअर साडेसातशे पेक्षा वर जाऊ शकतो आणि साडेसातशे पेक्षा जर कमी स्कोअर असेल तर आपल्याला काळजी करायचं काम नाही आपण या स्टेप्स फॉलो करू आपला सिबिल स्कोर साडेसातशे पेक्षा जास्त करा
धन्यवाद ..!
आपल्याला अधिक माहिती पाहिजे असेल तर आमच्या www.janvidrohi.com वर भेट द्या आणि आमच्या संपादक निवासी संपादक यांचेशी कनेक्ट राहा 9881643650 वर whataspp मेसेज करून जोडून घ्या