पंढरपूर,
शेवते येथे तालुकास्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन रविवार (दि.१८ रोजी)करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये ज्ञानदीप ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी नेत्रदीपक यश संपादन केले.
या स्पर्धेमध्ये संग्राम रघुनाथ जगताप (५० ते ५५ वजन गटात) याने प्रथम क्रमांक पटकावला, तसेच तेजस वसंत भिंगारे व राज सुनील शिरसट यांनीही द्वितीय क्रमांक पटकावून नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
संग्राम रघुनाथ जगताप याची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख श्री विनोद पिसे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .
यश संपादन केलेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन पर सत्कार ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कूल व ज्युनिअर कॉलेज,संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. किरण भिंगारे सर, सचिव मा. श्री. उमेश कदम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
या यशाबद्दल ज्ञानदीप ज्युनिअर कॉलेजचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.💐💐💐
🔸आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क.
प्रा.सदानंद बनसोडे -9637917007