विद्यार्थी दशेतच विद्यार्थांनी मानव अधिकार बाबत जागरूक बनावे आणि शिक्षक व पालक यांनी ही अधिकार हक्क याबाबत जागरूक बनावे असे विचार सेंट्रल ह्यूमन राईट संघटन चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे यांनी सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज चांदापुरी (ता.माळशिरस) सोलापूर या ठिकाणी व्यक्त केले
सुरुवातीस डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य कुंडलिक साठे व सायन्स विभागाचे प्रा.नितीन सरक,डॉ.कुमार लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले. पुढे बोलताना सेंट्रल ह्यूमन राईट चे डॉ.कुमार लोंढे म्हणाले ” सुशिक्षित लोकांनी मानवाधिकार,हक्क,मूलभूत अधिकार ,निसर्गदत्त अधिकार याविषयी ज्ञान घेणे आत्मसात करणे व या ज्ञानाचा उपयोग हा मानव जातीच्या कल्याणासाठी विशेषतः भारतातील श्रमिक, वंचित,शोषित, पीडीत,महिला,वृद्ध,मुले,कामगार या लोकांच्या न्यायासाठी वापर केला पाहिजे.परन्तु दुर्दैव हेच आहे कायद्याचा दुरुपयोग करणारे सुशिक्षित लोक करतात हे अनेक प्रकरणात सिद्ध झाले आहे.उदाहरण द्यायचे झाल्यास एक मराठी कुटुंबीय बेंगलोर येथे सोने गाळपाचे दुकान चालवत होते या कुटुंबावर कर्नाटक पोलीस व तेथील आय पी एस अधिकारी यांनी दीड किलो सोने चोरल्याच्या खोट्या आरोपाखाली पंचवीस केसेस दाखल केल्या आहेत त्यासाठी मी व आमचे संघटन लढा देत आहे यासाठी आपण सर्वांनी अधिकाराबाबत जागरूक बनले पाहिजे असे ही परखड मत त्यांनी व्यक्त केले
अकरावीच्या विद्यार्थिनी अमृता तुपे,इशा कवळे,आरती चोरमले,वैष्णवी कवळे या विद्यार्थिनी यांना संविधानाची उद्देशिका भेट देण्यात आली.कार्यक्रमास अरुणा मॅडम,काळे मॅडम,आप्पा धुमाळ सर आकाश महाराज इ उपस्थित होते