आटपाडी-पोपट वाघमारे
आटपाडी येथे आटपाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती लोकनेते पै.आण्णासाहेब (तात्या) श्रावणा रणदिवे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त शालेय स्तर वक्तृत्व स्पर्धां आयोजित करण्यात आल्या.आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती मा. हर्षवर्धन देशमुख (सरकार)यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
आटपाडी तालुक्याचे भाग्यविधाते श्रीमंत. बाबासाहेब देशमुख(दादा) व लोकनेते पै.आण्णासाहेब (तात्या) श्रावणा रणदिवे यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते मा.अरुण(भाऊ) वाघमारे, रयत शिक्षण संस्थेचे सल्लागार समिती सदस्य मा.विलास(नाना) शिंदे, कौठुळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मा.श्रीरंग(आण्णा) कदम, वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा नेते मा.साहेबराव चंदनशिवे, आटपाडी पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे मा.प्रशांत चंदनशिवे, बहुजन समता पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष मा. बळीराम रणदिवे, जनसेवा संघटनेचे अध्यक्ष मा.नवनाथ रणदिवे, पै.अजय रणदिवे,बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष भाई शिवराम मासाळ, पांडुरंग झंजे,नितीन(बापू) रणदिवे,मा. नवनाथ जावीर ,आदी मान्यवर उपस्थित होते.
संयोजक -दीपक रणदिवे सर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.विकीराज रणदिवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पै.अविनाश रणदिवे यांनी आभार मानले.
या स्पर्धेसाठी इयत्ता पहिली ते चौथीच्या लहान गटामध्ये ४८ स्पर्धकांनी, इयत्ता पाचवी ते आठवीच्या मध्यम गटामध्ये ६० स्पर्धकांनी आणि इयत्ता नववी ते बारावीच्या मोठ्या गटांमध्ये ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला.लहान गटासाठी नवनाथ वलेकर व गणेश कबीर यांनी, मध्यम गटासाठी गणेश ऐवळे व योगिता शिंदे यांनी आणि मोठ्या गटासाठी प्रा.संताजी देशमुख व प्रा.नागेश चंदनशिवे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण मंगळवार दि.२५ ऑक्टोबर रोजी दिघंची येथे लोकनेते पै.आण्णासाहेब (तात्या) श्रावणा रणदिवे यांच्या प्रथम स्मृतीदिनी करण्यात येणार आहे.