माळशिरस तालुक्यातील पिलीव व पिलीव परिसरात मटका,जुगार,दारू,वाळू असे अवैध धंदे जोरात असून ऑपरेशन परिवर्तन हे अभियान कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी यशस्वी चालवले असून सदर महत्वकांक्षी योजनेस पिलीव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत शेळके व त्यांचे पोलीस सहकारी हरताळ फासण्याचे काम करत आहेत
पिलीव येथील कर्मवीर शाळा व शाळेच्या शंभर मीटर परिसरात तसेच आजू बाजूच्या गावात दारू,मटका,जुगार असे अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून वाळू तस्करी व अवैध पैस्याच्या जोरावर गुंडगिरी जोपासत आहेत हे सर्व पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे होत आहे
या अवैध धंदे व पोलिसांच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ शुक्रवार रोजी पिलिव पंढरपूर रोड वर भव्य स्वरूपात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जेष्ठ नेते आबा बनसोडे,रिपाई तालुका उपाध्यक्ष रणजित सातपुते, दादा सरतापे इ नी दिला आहे निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, जिल्हापोलिस प्रमुख, जिल्हाअधिकारी,पोलीस निरीक्षक व पिलीव पोलीस स्टेशनला दिल्या आहेत