दिघंची पोपट वाघमारे
पुणे खडकवासला किरकटवाडी शिव रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी विशेष लक्ष देऊन वंचित घटक व सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देणार व खडकवासला पश्चिम भागातील जनतेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून व अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रलंबित प्रश्नावर आवाज उठवून येथील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत उद्योजक सुनील कांबळे यांनी व्यक्त केले. त्यांची
वंचित बहुजन आघाडीच्या हवेली तालुका पश्चिम विभाग अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा पश्चिम विभाग अध्यक्ष कमलेश उकंरडे, उपाध्यक्ष संतोष तांबे ,मयूर गायकवाड तर महासचिव राहुल इंनकर व उत्तम वंनशीव यांनी सुनील कांबळे यांच्यासह पश्चिम हवेली कार्यकारणीची निवड करण्यात आली.
उद्योजक सुनील कांबळे व पदाधिकारी यांचा सत्कार खडकवासला किरकटवाडी नांदेड व नांदोशी येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सत्कार समारंभ आयोजित केला होता यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते कौस्तुभ वाघमारे ,बाळासाहेब भालेराव,कैलाश झेंडे, पुरूषोत्तम कांबळे,बन्सी रोकडे, विशाल कांबळे,आनंद भालेराव, अशोक पहुरकर, अनिल कांबळे,सागर भालेराव,सम्मी सिंग, सचिन शेडगे,आप्पा कांबळे,जावेद खान, संदिप कांबळे,किरण यादव,हरीराम चेन्नापली,अहमद खान व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.