आज दिनांक 26 जून 20 22 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त महाविद्यालयात सकाळी आठ वाजता छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम श्री कदम जी एम सर यांच्या हस्ते करण्यात आला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पाटील एस टी .होते
यावेळी महाविद्यालयाचे श्री ताकतोडे सर यांनी राधानगरी धरण ,शेतकऱ्याच्या समस्या व शेतकऱ्यांना सहकार्य, तसेच बहुजनांना शिक्षणाचे मार्ग खुले करणे व त्यांच्या सामाजिक स्तर उंचावण्याच्या दृष्टीने आरक्षणाच्या माध्यमातून केलेले प्रयत्न व सामाजिक समते बाबतीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या कार्याची माहिती दिली.
यावेळी डॉ.जाधव ,डॉ. साळुंखे ,डॉ.काळे ,प्राध्यापक रणदिवे ,प्राध्यापक बिडवे मॅडम ,तसेच कदम सर गिड्डे सर ,श्री वाघमारे ,श्री उंबरे, श्री मंडले ,श्री आदलिंगे ,श्री सुर्वे इत्यादी सर्व स्टाफ उपस्थित होता.