निरा नरसिंहपूर : दिनांक: 15
प्रतिनिधी: डॉ. सिद्धार्थ सरवदे.
नीरा नरसिंगपूर तालुका इंदापूर येथील चैतन्य विद्यालय व कै. सुधाकर गोविंद महाविद्यालय नीरा नरसिंगपूर येथे कोरोना काळानंतर आज शालेय शिक्षण हे अगदी पूर्वीप्रमाणे चालू झाले. आज आलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे व विद्यार्थिनींचे औक्षण हे सौ. निकते मॅडम आणि सौ. दुनाखे मॅडम यांनी केले. विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प आणि वह्या आणि पुस्तके यांचे वाटप करण्यात आले.
संस्थेचे कार्यवाहक श्री. श्रीकांत आन्ना दंडवते,खजिनदार श्री.मगनदास क्षीरसागर, माजी प्राचार्य श्री. दुनाखे सर, शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. प्रभाकर जगताप,श्री प्रमोद दंडवते, श्री मुकुंद मामा देवळे, प्राचार्य श्री.लोखंडे सर आणि पालक डॉक्टर सिद्धार्थ सरवदे,श्री.सागर इंगळे साहेब, श्री.डिसले साहेब, श्री आप्पासाहेब गायकवाड, श्री बनकर साहेब, तसेच इतर पालक हे उपस्थित होते.
या स्वागत उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये चैतन्य विद्यालयांमध्ये कार्यरत असणारे आमचे गुरुवर्य श्री. लावंड सर, श्री. खारतोडे सर, श्री.नंदकुमार पाटील सर, श्री.पाटील सर,श्री. पवळ सर,श्री. देशपांडे सर, श्री.घाडगे सर,श्री. खटके सर, श्री.राऊत सर, श्री. बोरदे सर, श्री. तोडकर सर तसेच कर्मचारी श्री. तात्यासाहेब कोळी, श्री. सोमनाथ कोळी व पंपू देवळे उपस्थित होते.