निरा नरसिंहपुर:. दिनांक :१४,
प्रतिनिधी: डॉ. सिद्धार्थ सरवदे.
नीरा नरसिंगपूर तालुका इंदापूर येथे रविवार दिनांक १३ जून रोजी इयत्ता दहावी बॅच १९९६-९७ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहबंध सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बनकर सर होते. त्याचप्रमाणे श्रीकांत दंडवते, सौ. दंडवते काकू , श्री. दुनाखे सर, सौ. दुनाखे मॅडम, श्री.छोटे लोखंडे सर, श्री. मोठे लोखंडे सर, श्री. खिस्ते सर, श्री. लोंढे सर,श्री. नंदकुमार पाटील सर,श्री. पवळ सर, श्री.देशपांडे सर, श्री. विजय भोसले सर, श्री.खंडाळे सर, श्री. कुंभार सर ,श्री. तोडकर सर, श्री. खटके सर, मगनदास क्षीरसागर आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये आपले अनुभव व विचार हे डॉक्टर सौ.सुरेखा खंडाळे मॅडम,एपीआय श्री. विक्रम मोहिते साहेब,पत्रकार श्री. सतीश जगताप सर, सौ. वर्षाताई दंडवते तसेच पत्रकार डॉक्टर सिद्धार्थ सरवदे यांनी मांडले.या कार्यक्रमाचे आयोजन हे श्री. संतोष काका क्षीरसागर, श्री. रमेश काकडे साहेब,श्री. अमृत मोहिते पाटील साहेब, श्री. विक्रम मोहिते साहेब, श्री.कमलेश डिंगरे,श्री. शहाजी पावशे, श्री. संदीप लावंड, श्री. संतोष हावळे, श्री. कांतीलाल ठोकळे, श्री. संतोष मोहिते आणि मित्र परिवार यांनी अतिशय सुरेख आणि छान केले होते.
शिक्षक हे सेवानिवृत्त झाले की आपण समजतो की त्यांना विस्मरण होते पण आज येथे उपस्थित असलेल्या श्री. बनकर सर, श्री.खंडाळे सर व श्री. दुनाखे सर तसेच श्री.लोंढे सर यांनी आपापले विचार मांडून असे दाखवून दिले की शिक्षक जरी सेवानिवृत्त झाले तरी त्यांची बुद्धी ही पहिल्यापेक्षा जास्त तल्लख व तीक्ष्ण होते. प्राचार्य लोखंडे सरांनी खूप छान आठवणी सांगितल्या. सोन्याचे अलंकार घालण्यापेक्षा व घेण्यापेक्षा आपल्या मुलांना चांगल्या शिक्षणाचा अलंकार घालावा असे मत खंडाळे सर यांनी मांडले. विद्यार्थी व शिक्षक यांची भाषणे चालू असताना असे छान विचार ऐकताना हा कार्यक्रम संपूच नये असे सर्वांना वाटत होते.
आत्ताच्या कलियुगामध्ये आई-वडिलांची सेवा करावी आणि मुलींनीही आपल्या सासु-सासर्यांना प्रेम, माया द्यावी व चांगले सांभाळावे तसेच आपल्या पाल्यांवरती चांगले संस्कार करून देशाचा एक चांगला नागरिक घडवावा असे विचार नरसिंहपूर गावचे डॉक्टर सिद्धार्थ सरवदे यांनी मांडले.
या सोहळ्यामध्ये सर्व शिक्षक वृंद माजी विद्यार्थी व पालक तसेच आलेल्या पाहुण्यांना फेटा बांधून पुष्पहार,बुके ,श्रीफळ आणि श्रीमद् भगवद्गीता हा पवित्र ग्रंथ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना राजेशाही पद्धतीचे भोजन देण्यात आले व कार्यक्रमाची सांगता झाली.
🔅आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व जाहिरातींसाठी..
🔸सदानंद बनसोडे सर.
संपर्क📲 9637917007