आज दिनांक 12 जून 2022 रोजी भारतीय बौद्ध महासभा माढा तालुक्याच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा माढा तालुका सचिव आयुष्यमान विश्वास ताकतोडे सर व महिला विभागाच्या प्रमुख अरुणताई ताकतोडे तसेच मोडनिंब शहर महिला प्रमुख सारिका ताई बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक बुद्ध वंदना व सूत्र पठण घेण्यात आले .
याप्रसंगी आरपीआय पश्चिम महाराष्ट्राचे सचिव व मोडनिंब गावचे माजी सरपंच माननीय नागनाथ नाना ओहोळ व त्यांचे सर्व सहकारी तसेच जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष लखन लंकेश्वर, सर्व पदाधिकारी तन्मय ओहोळ, प्रदीप गाडे , आकाश सरवदे व कार्यकर्ते तसेच महिला , पुरुष , व बालके मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
ज्योती ओहोळ, ऊर्मिला ओहोळ, वंदना वाघमारे, रेखाताई ओहोळ,राणीताई ओहोळ, पल्लवी ननवरे, प्रिया ओहोळ, मंदाकिनी ताई ओहोळ, अरुणाताई ताकतोडे, गौतमी ओहोळ
इत्यादी महिलांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सारिका ताई बनसोडे यांच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला.